यवतमाळ - जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत काही दुकाने उघडण्याची मुभा दिली. प्रतिबंधित क्षेत्र वगळून नियव व अटीस अधीन राहून या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी सूचना दिल्या आहेत. मात्र, आज नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
रविवार, सोमवार अन् मंगळवार -
कापड, बुटिक अँड मॅचींग सेंटर, टेलरिंग, फुटवेअर, लॉन्ड्री, कुशन व कर्टन्स, घड्याळ विक्री व दुरुस्ती, बुक स्टॉल, जनरल अँड स्टेशनरी स्टोर्स, पेपर मार्ट, भांडे विक्री, इत्यादी दुकाने उघडण्यात येणार आहेत.
बुधवार आणि गुरुवार -
या दिवशी बॅनर पेंटिंग अँड रेडियम वर्क, ऑफसेट अँड प्रिंटिंग, फोटो स्टुडिओ, इंजिनिअरिंग व वेल्डिंग वर्क, मार्बल, ग्रॅनाईट अँड टाइल्स, प्लायवूड अँड सनमायका, पेंट व पेंटिंग साहित्य, कॅटर्स अँड बिछायत केंद्र, स्पोर्टस, टॉईज अँड म्युझिकल इत्यादी दुकाने सुरू राहतील.
शुक्रवार आणि शनिवार -
गॅसशेगडी दुरुस्ती, सायकल स्टोअर्स, मोबाईल विक्री व दुरुस्ती, संगणक दुरुस्ती, फर्निचर, क्रॉकरी, सायबर कॅफे, कार ॲक्सेसरीज, बॅग सेंटर, निर्बंध नसलेले डिस्पोजल प्लेट अँड ग्लासेस, सराफा (ज्वेलर्स), आर्टिफिशियल ज्वेलरी, बँगल्स, गिफ्ट सेंटर व काचेचे (ग्लासेस) इत्यादी दुकाने उघडण्यात येणार आहेत. मात्र, दुकानात येणाऱ्या ग्राहकाचे नाव, मोबाईल व पत्ता नोंद ठेवणे दुकानदारांना आवश्यक करण्यात आले आहे.