ETV Bharat / state

वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास; यवतमाळ येथील घटना - वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास

बँकेत पैसे काढण्याकरता आलेल्या वृद्धाला अज्ञात इसमाने फसवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे घडली. लखमा कोंडेकर (७४, रा.घोगुलदरा) असे या वृद्धाचे नाव आहे.

वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास; यवतमाळ येथील घटना
author img

By

Published : Aug 27, 2019, 11:56 PM IST

यवतमाळ - बँकेत पैसे काढण्याकरता आलेल्या वृद्धाला अज्ञात व्यक्तीने फसवल्याची घटना मारेगाव येथे घडली. लखमा कोंडेकर (७४, रा.घोगुलदरा) असे या वृद्धाचे नाव आहे.

वृद्धाची बँकेतच केली रोकड लंपास; यवतमाळ येथील घटना
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या कोंडेकर यांनी एका अनोळखी व्यक्तीकडून पावती लिहून मागितली. त्यावर दोन हजार रुपये रक्कम टाकण्यास सांगितले. याचा फायदा घेत चोरट्याने दहा हजार रक्कम पावतीवर टाकली. रोखपालाने दहा हजार रुपये वृद्ध व्यक्तीस दिल्यानंतर चोरट्याने मी पैसे मोजून देतो, असे सांगितले. यावर कोंडेकर यांनी दहा हजार कशाला काढले म्हणताच, ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी बसणाऱ्या साहेबांकडे आठ हजार बँकेत जमा करू असे चोरट्याने सांगितले. यानंतर, वृद्ध व्यक्तीस दुचाकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले. साहेबांची सही घेतो असे सांगून वृद्धास दुचाकीवरून उतरवले आणि चोरटा रोकड घेऊन फरार झाला. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घडलेल्या प्रकाराची घोगुलदरा गावचे सरपंच तुकाराम आस्वले यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर वृद्ध पोळा सणाची खरेदी करण्यासाठी बँकेतून २ हजार रुपये काढण्याकरता आले होते.

Intro:Body:यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा येथे वास्तव्यास असलेले लखमा कोंडेकर (७४)मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत असलेल्या खात्यातुन पैसे काढण्याकरिता आले असता अनोळखी इसमास पैसे काढण्याची पावती लिहुन मागितली. त्यावर दोन हजार रुपये लिही असे सांगितले, परंतु अज्ञानाचा फायदा घेत चोरट्याने दहा हजार लिहुन टाकली. रोखपाल यांच्याकडे पावती दिली. त्यांनी दहा हजार रुपये वृध्द इसमास दिले. असता अनोळखी चोरट्याने मी पैसे मोजुन देतो असे सांगितले. वृध्द इसम दहा हजार कशाला काढले आहे म्हणताच, ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी बसणाऱ्या साहेबांकडून आठ हजार वापस बँकेत जमा करण्याकरिता सही घ्यावी लागते. असे म्हणत तुम्ही माझ्या सोबत चला तेवढ्यात चोरट्याने रोकड खिशात घातली. वृद्ध इसमास दुकजकीवर बसवून वर्दळीच्या ठिकाणी आणले साहेबाची सही आणतो असे सांगुन वृद्धास दुचाकीवरून उतरविले आणि चोरटा रोकड घेऊन लंपास झाला. घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर अनोळखी चोरटा परिसरातील नागरिकांनी पहिल्यांदा बघितला आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जिवन जगणाऱ्या लखमा यांच्याकडे अल्प शेती आहे. यावरच उदरनिर्वाह होतो. वृद्ध पती-पत्नी दाम्पत्य शेतात दिवसभर मशागत करतात. जमीन हलक्या स्वरूपाची असल्याने फारसे उत्पन्न होत नाही. अशाही परस्थितीत ३४ हजार रुपये रुपये वृद्धपकाळात उदरनिर्वाह करण्याकरिता जमा केले होते. घडलेल्या प्रकारची पोलिसात घोगुलदारा येथिल सरपंच तुकाराम आस्वले यांच्या समक्ष तक्रार दाखल करून अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
वृद्ध लखमा पोळा या सणाचा बाजारातून वस्तू खरेदी करण्यासाठी सोमवारी बँकेतुन २ हजार रुपये काढण्याकरिता आले होते. अंधार पडला होता तरीही वृद्ध लखमा घरी आला नाही या कारणाने वृद्ध पत्नी चिंतातुर झाली होती. वृद्ध पत्नीने सरपंच यांचे घरी विचारणा केली असता सदर प्रकार कळला. सरपंच लखमाला घेऊन येत आहे असे सांगितल्यावर वृद्ध पत्नी घरी गेली. तेवढ्यात वृद्ध लखमा घरी येताच वृद्ध पत्नीला आलिंगन देऊन हुंदके देत घडलेला प्रकार सांगत होता. वृद्ध पत्नी रडतानांच लखमाला आधार देत होती. तेव्हा गावकऱ्यांचेही डोळे भरून आले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.