ETV Bharat / state

17 मे पर्यंत लॉकडाऊन नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आदेश दिले आहे. या काळात काय सुरू राहील आणि काय बंद राहील या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी देण्यात आलेल्या जीवनाश्यक आणि अत्यावश्यक बाबींसाठी वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजतापर्यंतच राहील.

author img

By

Published : May 5, 2020, 9:49 AM IST

Lockdown
लॉकडाऊन

यवतमाळ - राज्यात लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आदेश दिले आहे. या काळात काय सुरू राहील आणि काय बंद राहील या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या कालावधीत रेल्वे मधून प्रवासी वाहतूक बंद राहील. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा परवानगी असलेल्या व्यक्ती वगळता इतरांच्या आंतरजिल्हा व आंतर राज्य हालचालींसाठी बंदी राहील. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, संस्था व शिकवणी वर्ग बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला परवानगी राहील. सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायामशाळा आणि क्रीडा कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंबली हॉल आदी ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्य इतर मेळाव्यांवर प्रतिबंध राहणार आहे. सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील.

माहिती देताना यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

यवतमाळ जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश असल्यामुळे सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी (सायकल रिक्षा) आणि कॅब अग्री ग्रेटरच्या सेवा, जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्याबाहेरील बसेस बंद राहतील. सलून आणि ब्युटीपार्लरवर प्रतिबंध आहेत. आंतर तालुक्यात परवानगी दिलेल्या वाहनांना व व्यक्तींना प्रवासासाठी मुभा राहील. यासाठी तहसीलदारांकडून पासेस प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. चारचाकी वाहनांमध्ये 3 तर दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती जाण्यास परवानगी आहे. जीवनाश्यक वस्तुंचे उत्पादन करणारे युनिट्स, औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे त्यासंबंधी लागणारा कच्चा मालाचे उत्पादन करणारे युनिट, आय.टी.हार्डवेअरचे उत्पादन, पॅकेजींग सामग्रीचे उत्पादन सामाजिक अंतर राखून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहेत, अशी कामे सुरु राहतील. नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मॉल आणि मार्केट बंद राहील. यवतमाळ नगर परिषद क्षेत्र वगळता इतर सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये मार्केटमधील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. ई-कॉमर्स कंपनीद्वारे जीवनाश्यक वस्तू, औषध आणि वैद्यकीय उपकरणे विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार्यालयात 33 टक्के कामगारांना उपस्थित ठेवून कार्यालय सुरू करता येईल. पोलीस, होमगार्ड, अग्निशामक दल, आपात्तकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर परिषद, नगर पंचायत कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहतील.

परवानगी देण्यात आलेल्या जीवनाश्यक आणि अत्यावश्यक बाबींसाठी वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजतापर्यंतच राहील. तसेच संचारबंदीचे आदेश दिनांक 17 मे पर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.