ETV Bharat / state

Women Started Fish Farming In Yavatmal District : बचत गटाच्या माध्यामतून महिलांनी सुरू केली मत्स्य शेती - यवतमाळ जिल्ह्यात महिलांनी सुरू केला मत्स्य व्यवसाय

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती आहे. या सततच्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्याही होतात. (Women Started Fish Farming ) या आत्महत्यांमुळे कित्येक घरातील महिलांच्या आयुष्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. (Women Started Fish Farming In Yavatmal District) कित्येक लोक या घटनांमुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, बचत गटाच्या माध्यमातून काही महिलांनी अडीअडचणीच्या काळात उमेद निर्माण करण्याचे काम केले आहे.

बचत गटाच्या माध्यामतून महिलांनी सुरू केली मत्स्य शेती

author img

By

Published : Jan 6, 2022, 7:11 AM IST

Updated : Jan 6, 2022, 7:31 AM IST

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती आहे. या सततच्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्याही होतात. (Women Started Fish Farming In Yavatmal District) या आत्महत्यांमुळे कित्येक घरातील महिलांच्या आयुष्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. कित्येक लोक या घटनांमुळे हतबल झाले आहेत. परंतु, सततच्या नापिकीने हतबल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देणाऱ्या काही गोष्ट करण्याच्या दृष्टीने घडत आहेत. (Fish Farming In Yavatmal District) बचत गटाच्या माध्यमातून काही महिलांनी अडीअडचणीच्या काळात उमेद निर्माण करण्याचे काम केले आहे.

प्रतिक्रिया

काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात असणार्‍या महिलांना मत्सशेतीची वाट गवसली

ग्रामीण जीवननोन्नती अभियानच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या बचत गटाच्या 101 महिलांनी राळेगाव तालुक्यातील एकलारा गावात मत्सशेती करीत आर्थिक उन्नती साधली. महिलांनी मत्स्य शेतीतून एकप्रकारे नवनिर्माण करीत जगण्याची उमेदही जागविली आहे.
राळेगाव तालुक्यात एकलारा नावाचे गाव असून, उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या माध्यमातून 101 महिलांनी एकत्र येत नवनिर्माण महिला ग्रामसंघ स्थापन केला. काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात असणार्‍या महिलांना मत्सशेतीची वाट गवसली. गावात पूर्वी मासेमारीचा कंत्राट हा हर्रास करून दिला जात होता. महिलांनी हिंमत दाखवित तलाव हर्रासात घेतला. त्यांना शासनाकडून चार लाख रुपयांच्या निधीसह हॅचरी युनिटही मिळाले.

महिलांनी मासेमारी व्यवसायातून चार लाख रुपयांचा निव्वळ नफा

सुरुवातीला बाहेरगाववरून मत्सबिज आणले. मात्र, ते महागात पडले. त्यामुळे पुढील वेळपासून मत्स्यबिज तयार करूनच तलावात सोडणे सुरू केले. खाद्य, वजन, माशांची निगा, ब्रिडींग, औषधपोचार, विक्री सर्व गोष्टी महिलाच करतात. त्यांना वेळोवेळी शासनाकडून मार्गदर्शनही मिळते. कोरोना काळात सर्वच व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले. परंतु, महिलांनी मासेमारी व्यवसायातून चार लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला. दोन लाख रुपये आपसात वाटून घेतले आणि दोन लाख रुपये व्यवसायाच्या वाढीसाठी राखून ठेवले. एकलारा येथे रहू, कतला या मासोळ्या चांगल्या पद्धतीने मिळत असल्याने व्यापारी जागेवरच येऊन खरेदी करत आहेत.

हेही वाचा - Sindhutai Sapkal : अनाथांच्या दु:खांवर फुंकर घालणारी माय हरपली, ईटीव्ही भारतकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Last Updated : Jan 6, 2022, 7:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.