ETV Bharat / state

पुरात वाहून चाललेल्या महिलांचे वाचविले प्राण; यवतमाळ जिल्ह्यातील घटना - women life saved by citizens

उमरखेड तालुक्यातील कुरळी परिसरात रविवारी पाऊस चांगला पाऊस झाला. पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला. याचदरम्यान, संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणार्‍या 8 ते 10 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून (रूख ) नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, याचवेळेस ती नाव उलटली. त्यात या महिला पुराच्या पाण्यामध्ये पडल्या.

women life saved citizen who carried in rivulet
पुरात वाहून चाललेल्या महिलांचे वाचविले प्राण
author img

By

Published : Jul 6, 2020, 1:14 PM IST

यवतमाळ - पुरात वाहून जाणाऱ्या महिलांचे प्राण वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. ही घटना उमरखेड तालुक्यातील कुरळी येथे घडली.

उमरखेड तालुक्यातील कुरळी परिसरात रविवारी पाऊस चांगला पाऊस झाला. पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला. याचदरम्यान, संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणार्‍या 8 ते 10 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून (रूख ) नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, याचवेळेस ती नाव उलटली. त्यात या महिला पुराच्या पाण्यामध्ये पडल्या.

याचवेळी पलीकडच्या बाजूने संबंधित गावच्या कोतवालाचा मुलगा आणि त्याचे मित्र पूर पाहण्यासाठी गेले होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या आणि त्या वाहून जाणार्‍या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणले.

हेही वाचा - माणुसकीचा अंत..! रुग्णालयाबाहेरच 'त्याचा' तडफडून मृत्यू

या नाल्यावरील भोदूनगर ते कुरळी या दोन गावांना जोडणारा नाल्यावर पूल करण्यात यावा, अशी मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यासाठी दोर किंवा रुखचा वापर करतात. त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. या घटनेच्या निमित्ताने एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच शासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न गावकरी पुन्हा करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.