यवतमाळ - जिल्ह्यातील दिग्रस-मानोरा राज्य महामार्गावरील महेश कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागला. यामुळे जलवाहिनी फुटून त्यातून 25 फूट पाण्याची धार उंच उडत होती. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.
या जलवाहिनीद्वारे अरुणावती धरणावरून मानोरा तालुक्यातील 28 गावांना पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्यानंतर त्यातून उडणारी पाण्याची धार जलवाहिनीवरून जाणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श करत होती. त्यामुळे, रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण निर्माण झाले होते. मात्र, विद्युत तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नसल्याने मोठा अनर्थ टळला. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळच्या सुमारास या पाईपलाईनची दुरुस्ती केली.
हेही वाचा - हरिभाऊ खडके... सावरगड पंचक्रोशीचा अपराजित योद्धा