ETV Bharat / state

Nagar Panchayat Election 2021 : यवतमाळ जिल्ह्यात सहा नागरपंचातीत मतदानाला सुरुवात, ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात - राज्यातील नगरपंचायत निवडणूक

आज यवतमाळ जिल्ह्यातील सहा (Nagar Panchayat Election 2021) नगरपंचायतीध्ये 84 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर, ४७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणाक आहेत.

मतदान करताना मतदार
मतदान करताना मतदार
author img

By

Published : Dec 21, 2021, 9:11 AM IST

Updated : Dec 21, 2021, 9:21 AM IST

यवतमाळ - सहा नगरपंचायतीमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ४७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणाक आहेत. (Nagar Panchayat Election 2021) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

व्डिडिओ

राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात

राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात आहेत. (Nagar Panchayat Election In Yevatmal 2021) कळंब नगरपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६३ उमेदवार, महागाव नगरपंचायतीमध्ये १३ जागासाठी ९१ उमेदवार, मारेगाव नगरपंचायतीमध्ये जागांसाठी १४, झरीजामणी नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी ८७ तर बाभूळगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६२ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. याबरोबरच ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी मतदान होत आहे.

महिला मतदारांची संख्या दोन हजार ५२६

बाभूळगावात पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार दोन हजार ५४४, तर महिला मतदारांची संख्या दोन हजार ५२६ इतकी आहे. कळंब नगरपंचायतीत १४ हजार २०६ मतदार आहेत. त्यात पुरुष सात हजार ८८, महिला सात हजार ११८, राळेगावात १२ हजार ५२७ मतदार आहेत. झरीजामणी येथे दोन हजार २६८, महागावमध्ये सात हजार ५२०, तर मारेगाव नगरपंचायतीमध्ये सहा हजार ५०७ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.

हेही वाचा - राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद,15 पंचायत समित्यांचे आज मतदान

Last Updated : Dec 21, 2021, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.