यवतमाळ - तिला आई-वडील नव्हते, लग्नाचं वय झालं. एवढा खर्च कोण करणार? हा तिला पडलेला प्रश्न. लालसरे दाम्पत्य तिचे आई-वडील झाले. तिच्या लग्नाची जबाबदारी त्यांनी घेतली. आपल्या सासरी जाताना तिच्या डोळ्यात पाणी आलं, या लग्नाची गोष्टच निराळी होती. तिला निरोप देताना जणू अख्खं गावच तिचे माय-बाप झाले. लग्नाला उपस्थित सगळेच वऱ्हाडी गहिवरले. सुचिताचे लग्न केवळ त्या वस्तीसाठीच नाही, तर गावासाठी जिव्हाळ्याचा विषय झाला. तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिताच्या आयुष्यात ग्रामस्थांनी नव्या स्वप्नांची पेरणी केली.
पाच वर्षांची असताना हरवले पालकांचे छत
करोना काळात माणूसकी हरवत चाचली आहे, माणूस मानसाला ओळखत नाही, मात्र अजूनही काही ठिकाणी माणूसकी जीवंत आहे. याचा प्रत्यय तालुक्यातील तान्हा पोड येथील अनाथ असलेल्या सुचिताला आला आहे. आदिवासी बहूल भागातील तान्हा पोडमध्ये राहणारी सुचिता अवघ्या 5 वर्षांची असताना तिचे पितृछत्र हरपले. कर्जबाजारीपणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. अजारी असल्यामुळे काही महिन्यातच तिच्या आईचा देखील मृत्यू झाला. सुचिताचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्या वृद्ध आजी-आजोबांवर आली.
लालसरे दाम्पत्याने घेतली सुचिताच्या लग्नाची जबाबदारी
सुचिता आनाथ होती, लग्ना योग्य झाली होती. मात्र पैसे नसल्याने लग्न कसं करायचं असा प्रश्न पडला होता. गावातील नागरिकांनी याची माहिती पंचायत समिती सदस्य सुनिता लालसरे यांना दिली. त्यांनी सुचिताच्या लग्नाची जबाबदारी घेत, तालुक्यातील खैरी येथील सुरेश रघुजी आत्राम या तरुणासोबत तिचा विवाह लावून दिला. या विवाहाप्रसंगी अवघं गावच भावनिक झाले होते.
हेही वाचा - नाशिकच्या रतन लथ यांची राज्यपालांविरोधात जनहित याचिका