ETV Bharat / state

हलगर्जीपणाचा कळस.. पोलिओ डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी तीन जण सेवेतून बडतर्फ

पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका या तिघांनाही यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवेततून बडतर्फ केले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

use sanitizer as a polio dose
use sanitizer as a polio dose
author img

By

Published : Feb 2, 2021, 4:27 PM IST

Updated : Feb 2, 2021, 7:17 PM IST

यवतमाळ - घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सेवेततून बडतर्फ केले आहे. तर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दोन सदस्यीय समिती गठीत -

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी डॉ. ढोले आणि डॉ. पी. एस. चव्हाण अशी दोन सदस्यीय समिती नेमली असून वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर सीएचओ डॉ. अमोल गावंडे, आशावर्कर संगीता मसराम, अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांची सेवा समाप्ती कारवाई आली आहे. चौकशी अहवाल लवकरच येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिओ डोस म्हणून लहानग्यांना पाडले सॅनिटायझर

हेही वाचा - पोलिओची लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात गेला सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा, सोलापूर जिल्ह्यातील घटना

अध्यक्ष, आरोग्य सभापतींनी घेतली भेट

आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदा पवार आणि आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी बालकांची भेट घेतली. पोलिओ समजून सॅनिटायझर पाजणे हे हलगर्जीपणाचा कळस आहे. तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. दोन वैद्यकीय अधिकारी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे असल्याचे यावेळी सांगितले.

सोलापूरमध्येही डोस पाजताना झाकण बाळाच्या तोंडात गेले -

दरम्यान आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातही समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोलिओचा लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

भाळवणी येथील बाबा व माधुरी बुरांडे आपल्या एका वर्षाच्या बाळाला घेऊन पोलिओचा लस देण्यासाठी भाळवणी प्राथमिक केंद्रावर आले होते. लस देण्याची मोहीम सुरू असताना महिला कर्मचारी लस लांबूनच बाळांच्या तोंडात टाकत होते. त्यातूनच बुरांडे यांच्या लहान बाळाला तोंडात टाकत असताना, प्लास्टिकला सूक्ष्म तुकडा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या तोंडात गेला. बुरांडे पती-पत्नी एक वर्षाच्या लहान मुलाला घरी घेऊन गेले असता. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास होऊ लागला.

बाळाला तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले असता. बाळावर उपचार सुरू केले. शिवाय स्कॅनिंग करण्यात आले. मात्र, स्कॅनिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा तुकडा आढळला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांनी दिली. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवस बाळाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.