सातारा - शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जी आश्वासने दिली ती आम्ही पूर्ण करणार आहोत, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. आम्ही शब्द पाळणारे असून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणारच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांसाठी वेळ पडली तर रस्त्यावर सुध्दा उतरू, असे देखील त्यांनी सांगितले. ठाकरे यांनी मायणी, कातरखटाव येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मायणी येथे शिवाजी देशमुख या शेतकऱ्यांचे ५ एकर द्राक्ष बागेचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी शिवाजी देशमुख यांनी सर्व शेतकऱ्यांच्यावतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी, ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे सांगतानाच आम्ही शेतकरी मदत केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - सातारा-लातूर महामार्गाच्या कामामुळे शेत जमिनींना तळ्याचे स्वरूप; विकास नेमका कोणाचा?
हेही वाचा - नव्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आठवडयात सादर करा; उदयनराजेंची महामार्ग प्राधिकरणास सूचना