यवतमाळ - शहरातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आठ दुचाकी वाहने आहेत. एकूण किंमत एक लाख 25 हजाराचा मुदे्माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई यवतमाळ शहर पोलिसांनी रविवारी (24 जुलै)ला केली आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ - आकाश श्रीकृष्ण कुमरे रा. जांब ता. जि. यवतमाळ, जितेंद्र शंकर जाधव रा. तिवसा, नागसेन ऊर्फ बालु केशव मनवर रा. कामठवाडा, संदिप ऊर्फ मोधन भिमराव कांबळे रा. यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. मागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस - मोटर सायकल चोरी करणार चार मोटर सायकल जास्त प्रमाणात ठेवल्या जात असलेली ठिकाणे बसस्थानक शासकीय रुग्णालय खाजगी रुग्णालय, विविध बँक व ईतर तत्सम ठिकाणावरुन दुचाकी वाहने मास्टर चावीच्या सहाय्याने उघडून मोटर सायकल चोरी करत असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी स्थानीक गुन्हे शाखेला मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेशीत केले होते.
हेही वाचा - Smriti Irani : स्मृती इराणींनी पाठवली काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश आणि डिसोझा यांना नोटीस