ETV Bharat / state

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 'टु प्लस' योजना - 'Two Plus' scheme to curb rising crime

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलात ‘टू-प्लस’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६२९ सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आल्याची माहीती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील (भुजबळ) यांनी दिली.

गुन्हेगारी रोखण्यासाठी 'टु प्लस'
गुन्हेगारी रोखण्यासाठी 'टु प्लस' योजना
author img

By

Published : Jun 5, 2021, 1:02 PM IST

Updated : Jun 6, 2021, 11:38 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसदलात ‘टू-प्लस’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. टू-प्लस योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोन हजार ६२९ सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील (भुजबळ) यांनी दिली.

सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार

पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ
मार्च २०२१ पासून ‘टू-प्लस’ योजनेला गती मिळाली असून पोलीस दप्तरी दोन त्यापेक्षा अधिक गुन्ह नोंद असलेल्या गुन्हेगारांची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अभिलेखे अद्ययावत करून सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली. शरीर दुखापत, मालमत्ता, अवैध दारू गाळप, दारू तस्करी, जुगार आदी गुन्हे असलेल्यांनी भविष्यात गुन्हे करू नये, यावर पोलिसदलाचा कटाक्ष राहणार आहे. जिल्ह्यात २ हजार ६२९ गुन्हेगारांची यादी निश्‍चित करण्यात आली आहे. एमपीडीए अंतर्गत ४९ प्रकरणे कारवाईसाठी प्रस्ताविक आहेत. त्यातील हिस्ट्रीशीटर असलेल्या दोघांची ऑर्डर निघाली. जिल्ह्यात ३१ संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्या असून, १०५ सराईतांची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक ठाण्यात चार कर्मचार्‍यांचे पथकयात हद्दपारीचे १७५ प्रस्ताव असून, शिक्षा झालेल्यांचा समावेश आहे. १००४ गुन्हेगारांच्या विरुद्ध कलम ११० अतंर्गत तर १२२६ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक व एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्याने भविष्यात धोकादायक कारवायांना चाप बसेल. २५ जूनपर्यंत सर्व प्रस्ताव संबंधित कार्यालयात पोहचतील. टू-प्लसला अधिक गती देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पोलीस अधिकारी व तीन कर्मचार्‍यांचे पथकही नेमण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबईत एनसीबीची छापेमारी; 2 आरोपींना अटक

Last Updated : Jun 6, 2021, 11:38 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.