यवतमाळ - बोरीअरब येथून बिघडलेला ट्रॅक्टर दुरुस्त करून घेऊन पांढुर्णा येथे येत असताना रमेश काळे यांच्या शेताजवळ ट्रक्टरचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एकाचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. कुंदन हिरसिंग पवार, संदीप राठोड (रा. पांढुर्णा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
बोरीअरब येथून ट्रॅक्टरचे दुरुस्ती काम करून चालक संदीप राठोड व कुंदन पवार हे पांढुर्णा येथे परत येत होते. याचवेळी अचानक रमेश काळे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर पलटी झाला. यात सोबत असलेला कुंदन पवार यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर मंगेश रामाणी (रा.पांढुर्णा) यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्यापही कळु शकलेले नाही.
या अपघाताचा पुढील तपास लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू आहे. याआधी सुद्धा याचठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे आमदार निलेश पारवेकर यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे प्रत्येक वळणावर सुद्धा स्पीड ब्रेकर असण्याची नितांत गरज आहे. या अपघातामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.