ETV Bharat / state

दुचाकी-चारचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू - यवतमाळ जिल्हा बातमी

दुचाकी व चारचाकी वहनाचा भीषण अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगुळ साखर कारखान्याजवळ झाला. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

दुचाकी
दुचाकी
author img

By

Published : May 29, 2021, 6:52 PM IST

यवतमाळ - शैक्षणिक कामानिमित्त यवतमाळ येथे आलेल्या दुचाकीस्वार दोघांना भरधाव कारने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना आज (दि. 29 मे) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मांगुळ साखर कारखान्याजवळ घडली. अरबाज खान अफरोज खान (वय 21 वर्षे) व त्याचा चुलत भाऊ फैजन खान फिरोज खान (वय 20 वर्षे, दोघे रा. काळी दौलत) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

मांगुळ साखर कारखाना जवळील घटना

मृत दोघेही काळी दौलत येथून आपल्या दुचाकी (एम एच 29 बी ई 7831) यवतमाळ येथे काही शैक्षणिक कामानिमित्त आले होते. दरम्यान, गावाकडे परत जात असताना यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगुळ साखर कारखान्याजवळ त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी मोटारीने (एम एच 49 ए ई 3429) जबर धडक दिली. अपघतात इकता भीषण होता की जोरदार होती की यामध्ये कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीचा चुराडा झाला आहे. दोघेही दुचाकीस्वार फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले.

याप्रकरणी फरान अहमदखान रोब खान (वय 45 वर्षे, रा. काळी दौलत) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - यवतमाळ : आर्णीत मनसेचे नगरपरिषदेत 'गोट्या खेळो आंदोलन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.