ETV Bharat / state

Yavatmal crime : बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह; चार महिन्याची गरोदर झाल्यानंतर गुन्हा दाखल - she get Four months pregnant

12 वर्षाच्या मुलीचा बालविवाह केला. ( Twelve years old girl was forced ) चार महिन्याची गरोदर (she get Four months pregnant ) मुलगी दवाखान्यात गेल्याने बिंग फुटले. (child marriage by her mother in yawatmal) मुलीच्या आई विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (girl was forced into a child marriage ) ( yavatmal crime )

Child Marriage
बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह
author img

By

Published : Dec 30, 2022, 9:21 AM IST

बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह

यवतमाळ : ( yavatmal crime ) खेळण्याबागडण्याच्या कोवळ्या वयातच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ( Child Marriage ) लावून दिला. यात पीडित बालिका ही चार महिन्याची गरोदर राहिली. परंतु दवाखान्यात उपचारासाठी गेल्याने सर्व प्रकार उजेडात आला. (child marriage by her mother in yawatmal) या प्रकरणात पतीसह पिडीतेच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( she get Four months pregnant ) ही घटना मारेगाव तालुक्यातील एका गावामध्ये आज उघडकीस आली. ( child marriage by her mother in yawatmal )

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला : बालविवाह प्रथा रोखण्यासाठी स्वातंत्र पूर्व काळा पासून अनेकांनी संघर्ष केला. यासाठी इंग्रज शासना सोबत अनेक समाज सुधारकांनी लढा दिला. या विरुद्ध शासनाने ही कडक कायदे केले आहे. प्रशासन ही वेळोवेळी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतात. तरीही समाजात आज ही प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून बालविवाह होत असल्याचे यातून निदर्शनास येते. असाच काही प्रकार आज मारेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. येथिल एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह 5 महिन्या पूर्वी म्हणजेच 18 जुलै 2022 ला नागपूर जिल्ह्यातील एका मुलासोबत लावून दिला. त्यावेळेस मुलीचे वय अवघे 12 वर्षाचे होते. ( Twelve years old girl was forced ) लग्नानंतर पिडीत बालिका ही चार महिन्याची गरोदर झाली. त्यानंतर आईने चार महिन्याच्या आपल्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेले, यावेळी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत याविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. (Complaint filed in Maregaon police station) त्यावरून पोलिसांनी पिडीतचे आई व नागपूर जिल्हातील पतीविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, बलात्कार आदी कलमा अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची : राज्यात बालविवाह का होतात या संदर्भात विठ्ठल बडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्याकडे सामाजिक आर्थिक वंचित समाज भरपूर आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील प्रमाण देखील त्यांच्यामध्ये आहे. सोबतच शिक्षणाचे प्रमाण कमी असते. मुलींना शाळेमध्ये शिकू देण्याकडे कल अजूनही परिपूर्ण विकसित झालेला नाही आणि अनेक पातळीवरचे दबाव मुलींच्या मनावर असतात तसेच सामाजिक रीत आणि परंपरा या देखील याला हातभार लावतात. कोरोनाच्या काळानंतर बालविवाहाचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येते. दर वर्षी सुमारे एक लाख बाल विवाह राज्यात होतात. तर एडवोकेट असीम सरोदे यांनी सांगितले की, आपला समाज अजूनही एका जुनाट विषमतावादी व्यवस्थेमध्ये आहे. त्यामुळे एका बाजूला समतेच्या मूल्यांच्या आधारे लोकांमध्ये जनजागृती करणे जरुरी आहे. तसेच शासनाने व पोलीस यंत्रणेने देखील कायद्याचे काटेकोर पालन करत बालविवाह होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.