ETV Bharat / state

उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला बडतर्फ करा; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मागणी

नियंत्रण अधिकारी रेड्डी यांना तत्काळ अटक करून बडतर्फ करण्यात यावे. शिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात यावी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

वन कर्मचारी आंदोलन
वन कर्मचारी आंदोलन
author img

By

Published : Mar 30, 2021, 11:04 PM IST

यवतमाळ - मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 5 एप्रिल पर्यंत बडतर्फ केले नाही तर, काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच यावेळी फॉरेस्ट रेंजर असोसिएशन, वनपाल वनरक्षक संघटना, कास्ट्राईब संघटना, महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फॉरेस्ट संघटना यांच्यावतीने मुख्य वनसंरक्षक यांना निदर्शने करत निवेदन देण्यात आले आहे.

वन विभागाचे कर्मचारी
अन्यथा पाच एप्रिलपासून काम बंद आंदोलनउपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून कलम 302 354 ए व 374 यांचा समावेश करून अभियोग चालविण्यात यावा. नियंत्रण अधिकारी रेड्डी यांना तत्काळ अटक करून बडतर्फ करण्यात यावे. शिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात यावी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

हेही वाचा-केंद्राच्या 3 कृषी कायद्यांविरोधात राज्य सरकारचा नवा अध्यादेश!

हेही वाचा-धाडसाने साप पकडणारी आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं -दीपालीची मैत्रिण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.