ETV Bharat / state

यवतमाळ; कोविड चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

यवतमाळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यू दराचा आलेख वाढता असल्याने जिल्हाधिकारी यांनी शहरातील संपूर्ण व्यापाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

कोविड चाचणी
कोविड चाचणी
author img

By

Published : Mar 27, 2021, 3:37 PM IST

Updated : Mar 27, 2021, 7:16 PM IST

यवतमाळ - शहरात कोरोनाने थैमान घातल्याने यंत्रणा अलर्ट झाली आहे. परिणामी यवतमाळ तहसीलदारांनी कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तरच दुकाने उघडता येणार अन्यथा बंद ठेवावे लागेल, अशी सूचना व्यापाऱ्यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार, नगरपरिषद तसेच पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने शहरात कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

कोविड चाचणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
तहसीलदारांसह शहर पोलिसांकडून दुकानदारांची पाहणीयवतमाळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यू दराचा आलेख वाढता असल्याने जिल्हाधिकारी यांनी शहरातील संपूर्ण व्यापाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. त्यानुसार तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी शहरातील संपूर्ण व्यापाऱ्याची कोरोना चाचणी करण्यासाठी कॅम्प लावले आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तहसीलदार, नगरपरिषद तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने संपूर्ण बाजारपठांमध्ये सर्व व्यापारी व दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कोविड चाचणी केली की नाही याची खात्री केली. दरम्यान ज्या व्यापाऱ्याकडे कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नव्हते, अशा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा- 'फॅशन स्ट्रीट'च्या आगीत 500 पेक्षा जास्त दुकाने खाक

Last Updated : Mar 27, 2021, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.