ETV Bharat / state

जरीजामनी तालुक्यातील बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकूळ; तिघांवर हल्ला - Jarijamani taluka news

जरीजामनी तालुक्यातील बंदीवाढोना शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातला. यात वेगवेगळ्या घटनेत वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले.

tiger
वाघ संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 15, 2021, 9:53 PM IST

यवतमाळ - जरीजामनी तालुक्यातील बंदीवाढोना शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातला. यात वेगवेगळ्या घटनेत वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. दोन हल्ल्यातील व्यक्ती गंभीर जखमी असून तिस-या घटनेत तरुणाने शिताफिने वाघाच्या तावडीतून सुटका केल्याने तो किरकोर जखमी झाला आहे. दरम्यान, वाघाला शोधण्यासाठी लोकांनी काठ्या घेऊन एकच गर्दी केली होती. तिनही जखमींना यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझेंची उच्च न्यायालयात धाव

एका तासात तिघांवर हल्ला

बंदीवाढोना येथील रामदास भीमा कुमरे यांचे शेत आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास कुमरे यांच्या शेतात गावातीलच पैकु मडावी (35) हा ज्वारीला पाणी देण्याकरिता गेला. दरम्यान तिथे आधीपासूनच एक वाघ दबा धरून होता. वाधाने पैकुवर अचानक हल्ला केला. यान पैकु मडावी याच्या डोक्यावर पायावर व पाठीवर गंभीर जखमी झाली. या घटनेच्या अर्ध्या तासाने आधीच्या हल्ल्याच्या काही अंतरावरच मासे पकडण्याकरिता गेलेल्या प्रकाश आत्राम (40) याच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाशच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या. दरम्यान काही वेळातच परिसरातीलच अजय आत्राम (22) यांच्यावरही वाघाने हल्ला केला परंतु अजय वाघाच्या तावडीतून सुटून पळण्यात यशस्वी झाला. तो किरकोळ जखमी झाला.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

तिनही जखमींना पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. जखमी शेतकऱ्यांना नेण्याकरिता वनविभागांने रुग्णवाहिक किंवा इतर सुविधा न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. रविवारी (ता. 14) सकाळीच चिंचघाट शेतशिवारात वाघाने हल्ला करून दोन बैलांना फडशा पाडला होता. त्यानंतर आज दुपारी वाघाने बंदीवाढोना शेतशिवारात तिघांवर हल्ला केला आहे. महिनाभरात वाघाने जनावरांवर केलेल्या हल्ल्याच्या घटना सातत्याने पुढे येत असताना आता वाघांनी आता मानवांवरही हल्ला करणे सुरू केले आहे. झरी तालुक्यात वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत आले आहे.

हेही वाचा - २ हजार रुपयांच्या नोटांची दोन वर्षे छपाई नाही- अनुरागसिंह ठाकूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.