ETV Bharat / state

पैनगंगेच्या गाळात अडकून शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - death

शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय तरुण घरच्या गायी आणि बैलांना चरावयास घेऊन गेला होता. यावेळी नदीकाठच्या गाळात फसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
author img

By

Published : Aug 5, 2019, 11:34 AM IST

यवतमाळ- पैनगंगा नदीच्या गाळात अडकून एका शेतकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फुलसांवगीत घडली आहे. शंकर पुरी(२२) असे त्या तरुणाचे नाव आहे. जनावरे चारायला गेल्यानंतर ही घटना घडली आहे.

शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शंकर बराच वेळ होऊनही परत आला नसल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. यावेळी शोधकरत्यांना फुलसावंगी येथे गायी, बैल शेतात चरत असताना दिसल्या. परंतु, शंकर कुठेच दिसत नव्हता. सगळीकडे चिखल असल्यामुळे त्याच्या पावलांच्या निशाणीवरून त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी शंकरचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती महागाव पोलीस ठाण्याल देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. महागाव पोलीस पुढील तपास करीत आहे

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यातील पैनगंगेच्या किनाऱ्यावरील फुलसावंगी जवळ चार किलोलोमीटर अंतरावरील मौजे काळी (टेम्भी) येथील शेतकरी कुटुंबातील २२ वर्षीय युवक घरच्या गायी आणि बैल चारावयास गेला असता नदीकाठच्या गाळात फसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
मृतक शंकर पुरी हा घरचे गायी बैल चारावयास घेऊन गेला होता. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही म्हणून घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. गायी बैल शेतात चरत असताना दिसले परंतु शंकर कुठेच दिसत नव्हता. सध्या सगळीकडे चिखल असल्यामुळे त्याच्या पावलांच्या निशाणी वरून शोध घेतला असता त्याचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती महागाव पोलिस ठान्याला देण्यात आली. पंचनामा करून शवविच्छेदाना साठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविन्यात आले.
शंकरच्या दुर्दैवी मृत्यू मूळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोक काळा पसरली असून महागाव पोलीस पुढील तपास करीत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.