यवतमाळ - पुसद तालुक्यातील पैनगंगेच्या तीरावर असलेल्या गौळ ब्रूद्रुक या गावचा संपर्क मागील तीन दिवसापासून तुटला आहे. मागील 5 दिवसापासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने ( Panganga River ) वाहत आहे. गावाच्या मागच्या बाजूने पैनगंगेचा पूर गावाला येऊन भिडत असतो तर गावासमोरून वाहणाऱ्या लेंडी नदीला पुर आल्याने गावचा चारही बाजूने संपर्क तुटतो. डोंगर भागात पाऊस झाला की डोंगरासह इतर दोन तीन गावाचे पावसाचं पाणी लेंडी नदीला येत असते. ईसापूर धरणाचे पाणी सोडल्यास या पुराची तीव्रता अधिक बिकट असते.
हेही वाचा -Panchganga: पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
नदीवरील पुलांची उंची कमी - गौळ बुद्रुक येथील लेंडी नदीवरील पुलांची उंची कमी असल्याने गावचा संपर्क तुटत आहे. पावसामुळे शेतातील गोठ्यात दोन दिवसापासून जणांवर उपाशी बांधून ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून पुराच्या पाण्यातून जनावरांच्या चारा पाण्यासाठी जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाकडे येथील पुलांची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मात्र, या मागणीकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. पुरामुळे शाळेतील शिक्षकांना देखील जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे.
दरम्यान, संततधार पावसाने नांदेडमध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून प्रवाहित ( Panganga River Is Overflowing ) झाली. त्यामुळे सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा ( Sahastrakund Waterfall ) रुद्रावतार पहायला मिळत आहे. या पूर सदृश्य पाण्यामुळे हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर या तिन्ही तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय, त्याच बरोबर काही गावातील विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सकाळ पर्यंत सातत्याने बरसतोय. किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावे लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आहे त्याच पांदण रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून,पैनगंगा नदीला पूर येण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची ( Nanded rains update ) नोंद झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने ( Nanded District Administration ) केले आहे.
हेही वाचा - Tractor Plunged into Water : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; खारी नदीत ट्रॅक्टर गेला वाहून, पाहा Video