ETV Bharat / state

धान्याच्या गोडाऊनला आग, 2 कोटींचा शेतमाल जळून खाक

author img

By

Published : Apr 29, 2021, 7:51 PM IST

यवतमाळ मधील दिग्रस मानोरा रोडवरील रामनगर जवळील वीज वितरण केंद्रासमोर असलेल्या सेवा वेअर हाऊसला दुपारच्या सुमारास आग लागली. गोडाऊनमध्ये असलेल्या तूर, चना, ढेप, सरकी व कापसाच्या गठाणी आगीत जळून खाक झाल्या. यात जवळपास ८ ते १० शेतकरी व व्यापाऱ्यांच्या जवळपास दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले.

Yavatmal
यवतमाळ

यवतमाळ - दिग्रस मानोरा रोडवरील रामनगर जवळील वीजवितरण केंद्रासमोर असलेल्या सेवा वेअर हाऊसला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात गोडाऊनमध्ये असलेल्या तूर, चना, ढेप, सरकी व कापसाच्या गठाणी आगीत जळून खाक झाल्या. त्यामुळे जवळपास ८ ते १० व्यापाऱ्यांच्या दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वेअर हाऊस जवळील शेतातील कचरा जाळल्यानेच ही आग लागली असल्याची शंका घटनास्थळावरील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दोन कोटींच्या नुकसानीचा अंदाज

सकाळपासून सेवा वेअर हाऊस असलेल्या शेतातील कचरा जाळणे सुरू होते. परंतु हे धुरे जळणे बंद झाल्यानंतर गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे परीसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी गोडाऊनमध्ये पाहिले. तेव्हा आतमधील शेतमालाला आग लागल्याचे दिसले. यानंतर संबंधितांना माहिती देण्यात आली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.

या आगीत शेतकरी व व्यापाऱ्यांचा मिळून जवळपास दोन कोटी रूपयांचा शेतमाल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश वजिरे व ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता आवश्यक त्या सुचना दिल्या. दरम्यान, नगर परिषद दिग्रस, पूसद, दारव्हा व मानोरा येथील अग्निशामक दलाकडून संयुक्तरित्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

हेही वाचा - केंद्राकडून मिळाला लशींचा मोजकाच साठा; मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद

हेही वाचा - किमान 15 दिवसांचा कडकडीत बंद पाळायलाच हवा - मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.