यवतमाळ - कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर अनेकजण मात करून आपल्या घरीही परतत आहेत. अशाच एका 93 वर्षाच्या आजीने या कोरोना व्हायरसवर मात केली आहे.
घरातील सदस्य, डॉक्टरांना श्रेय
जिल्ह्यातील पुसद शहरातील नवीन पुसद येथे राहणाऱ्या प्रभावती काळीकर या कोरोनवर मात करीत सुखरूप घरी पोहोचल्या आहेत. याचे श्रेय घरातील सर्व सदस्य व जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळमधील सर्व स्टाफ व डॉक्टरांना देतात.
'कोरोनाला घाबरू नका'
प्रभावती काळीकर यांनी या काळात सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आजी कळकळीने जनतेसमोर आवाहन करत आहे. रुग्णालयात असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व उपाययोजना केल्या. औषधी नियमित घेतली असून आहारावरसुद्धा प्रत्येकाणे लक्ष दिल्यास कोरोनवर मात करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना हा काही मोठा आजार नाही. त्यावर उपचार घेतल्यास बरा होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे दिसतात उपचार घेतल्यास यातून नक्की बरे होऊन घरी येऊ शकत असल्याचे 93 वर्षाच्या आजीने सांगितले.