यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिल्या जात होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आज जिल्ह्याला 12 हजार लसींचा पुरवठा अकोला येथून करण्यात आला. हा साठा फक्त दोन दिवस पुरणार असून लवकरच जिल्ह्याला पुन्हा लस प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.
हेही वाचा - खासगी 'कोविड' रुग्णालयात कोरोनाबाधितांची आर्थिक लूट; लाखो रुपयांचे बिल हाती
45 वर्षांवरील नागरिकांना लस
जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्याकरिता दरदिवशी 7 हजारांहून अधिक लसींची मागणी आहे. 178 केंद्रांवरून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू असून शहरी व ग्रामीण भागात 45 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
आता 1 लाख 54 हजार डोस प्राप्त
जिल्ह्याला 1 लाख 54 हजार डोस प्राप्त होते. यातील एक लाख 52 हजार डोस देण्यात आले. आज आलेला जवळपास 12 हजार डोसचा साठा शिल्लक असून दोन दिवस तो पुरणार आहे. जिल्ह्याला नऊ लाख लसींची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे. लवकरच डोस पुरवठा करण्यात येणार असल्याचे डॉ. वारे यांनी सांगितले.
हेही वाचा - कचरा कंत्राट घोटाळा; टॅक्सीतून उचलला कचरा, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल