ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी बनविली सौर ऊर्जेवरील ई-सायकल; एका चार्जिंगमध्ये धावणार २५ किलोमीटर - yavatmal

शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होत आहे. शिवाय प्रदूषणही होत आहे. त्याचबरोबर, या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही होते. यावर उपाय म्हणून नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केले आणि ई-सायकलची निर्मिती केली.

e-cycle pusad
सौर ऊर्जेवरिल ई-सायकल
author img

By

Published : Feb 29, 2020, 6:07 PM IST

यवतमाळ - गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. आज देशात पर्यावरण संरक्षण आणि उर्जा बचतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल इंधनाची बचत करण्यासाठी पूसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील ई-सायकलची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांची ही निर्मिती उर्जा बचतीच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जात आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली सौर उर्जेवरील सायकल

शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावर मोठा खर्च होत आहे. शिवाय प्रदूषणही होत आहे. त्याचबरोबर, या वाहनांमुळे वाहतूक कोडीही होते. यावर उपाय म्हणून नाईक अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील भावी अभियंत्यांनी संशोधन केले आणि ई-सायकलची निर्मिती केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सायकल, इलेक्ट्रिक मोटर, लीड अ‌ॅसिड बॅटरी, चार्जर, सायक्लोमीटर या साधनांचा उपयोग केला. पुढे सायकलच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोलर पॅनलचा वापर केला. विद्यार्थ्यांनी या ई-सायकलची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ई-सायकल शहरातील रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

ई-सायकलला एक्सलेटर बसविण्यात आले आहे. बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास सायकल ताशी २२ ते २५ किलोमीटर वेगाने धावते. एका चार्जिंगमध्ये ही ई-सायकल २५ किलोमीटर पर्यंतचा प्रवास पूर्ण करते. केवळ १२ हजार रुपये एवढ्या खर्चात ही ई-सायकल रस्त्यावर धावू शकत असल्याने बाजारातील इतर सायकलींपेक्षा सामान्यांच्या खिशाला ती सहज परवडते. सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय, चढावर आवश्यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय आहे. या प्रकल्पात यांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान सहभागी होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा- पिकाला पाणी देताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.