ETV Bharat / state

यवतमाळमध्ये प्रहार संघटनेकडून योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड, २६ जूनपर्यंत शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी

प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि शाहू महाराज पुतळा समितीने पोस्ट ऑफिस चौकात शाहू महाराजांचा पुतळा हवा, अशी भूमिका घेत योग मुद्रेची मूर्ती दगडफेक करून विद्रुप केली.

योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड करताना प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता
author img

By

Published : Jun 18, 2019, 7:03 AM IST

यवतमाळ - प्रहार जनशक्ती पक्षाच्या विधानसभा प्रमुखाने शहरात सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड केली. पोस्ट ऑफिस चौकात योगाभ्यासाचा संदेश देण्यासाठी या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. बिपीन चौधरी, असे मूर्तीची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते

प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि शाहू महाराज पुतळा समितीने पोस्ट ऑफिस चौकात शाहू महाराजांचा पुतळा हवा, अशी भूमिका घेत योग मुद्रेची मूर्ती दगडफेक करून विद्रुप केली. याठिकाणी शाहू महाराजांची प्रतिमा आहे. मात्र, त्यापुढे योग मुद्रेतील मूर्ती उभारण्यात आल्यामुळे उद्घाटन होण्यापूर्वीच तीची नासधूस करण्याचा प्रयत्न प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख चौधरी आणि शाहू महाराज पुतळा समितीच्या सदस्यांनी केला. यामुळे शहर सौंदर्यीकरणाच्या कामात खीळ बसली आहे.

दरम्यान, २६ जूनपर्यंत शाहू महाराजांचा पुतळा न बसविल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी या आंदोलनकर्त्यांनी दिला.

Intro:प्रहरकडून योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोडBody:यवतमाळ : प्रहार जनशक्ती पक्षाच्या विधानसभा प्रमुखाने शहरात सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या योगमुद्रेतील मूर्तीची तोडफोड केली. पोस्ट ऑफिस चौकात योगाभ्यासचा संदेश देण्यासाठी ह्या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती. मात्र प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि शाहू महाराज पुतळा समितीने याठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा हवा अशी भूमिका घेत योग मुद्रेची मूर्ती दगडफेक करून विद्रुप केली. पोस्ट ऑफिस चौकात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा व्हावा अशी मागणी आंदोलकांची होती. याठिकाणी शाहू महाराजांची प्रतिमा आहे. मात्र त्यापुढे योग् मुद्रेतील मूर्ती उभारण्यात आली. या मूर्तीचे उदघाटन होण्यापूर्वीच तीची नासधूस करण्याचा प्रयत्न प्रहार पक्षाचे विधानसभा प्रमुख बिपीन चौधरी आणि शाहू महाराज पुतळा समितीचे सदस्यांनी केल्याने शहर सौंदर्यीकरण कामात खीळ बसली आहे. दरम्यान 26 जून पर्यंत शाहू महाराज यांचा पुतळा न बसविल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा ईशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.