ETV Bharat / state

उमरखेडमधील बसचा अपघात : आठ तासांनी दोघांचे मृतदेह सापडले; बचावकार्य सुरुच - उमरखेड एसटी बस बुडाली

उमरखेड जवळून दोन किमी अंतरावर असलेला पुसद मार्गावरील दहागाव नाल्यात हिरकणी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. ही बस नांदेडवरून नागपूरच्या दिशेने पुसद मार्गे जात होती. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात तब्बल आठ तासानंतर दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर आणखी 1 जण बेपत्ता आहे. या अपघातातील एकूण मृतांची संख्या 3वर पोहोचली आहे. तर 2 जणांना वाचविण्यात यश आले. अजूनही बचावकार्य सुरूच आहे.

umarkhed bus drown news
umarkhed bus drown news
author img

By

Published : Sep 28, 2021, 9:53 AM IST

Updated : Sep 28, 2021, 8:21 PM IST

यवतमाळ - उमरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात तब्बल आठ तासानंतर दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर आणखी 1 जण बेपत्ता आहे. या अपघातातील एकूण मृतांची संख्या 3वर पोहोचली आहे. तर 2 जणांना वाचविण्यात यश आले होते. अजूनही बचावकार्य सुरूच आहे. एका एसटी बस कर्मचाऱ्यांचा मृत्यूदेह उशिरा मिळाला. मात्र, तो चालक की, वाहक हे समजले नाही. घटनास्थळी तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरू केले. आता चार जणांपैकी एक एसटी कर्मचारी आणि एक प्रवाशी बेपत्ता आहेत.

घटनेचा व्हिडिओ

या बसमध्ये 4 प्रवाशी आणि चालक व वाहक असे 6 प्रवासी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती.

प्रवासी तेलंगणा आणि पुसद येथील -

उमरखेड जवळून दोन किमी अंतरावर असलेला पुसद मार्गावरील दहागाव नाल्यात हिरकणी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. ही बस नांदेडवरून नागपूरच्या दिशेने पुसद मार्गे जात होती. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात तब्बल आठ तासानंतर दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर आणखी 1 जण बेपत्ता आहे. या अपघातातील एकूण मृतांची संख्या 3वर पोहोचली आहे. तर 2 जणांना वाचविण्यात यश आले. अजूनही बचावकार्य सुरूच आहे.

प्रतिक्रिया

बसमध्ये होते सहा प्रवासी -

सुरेश रंगप्पा सुरेवार (५४) असे चालक तर भीमराव लक्ष्मण नागरिकर (५२) वाहकाचे नाव आहे. शेख सलीम शेख इब्राहीम (५०) मृतातील एकाचे नाव असून तो पुसद येथील रहिवाशी आहे. या बसमध्ये सहा प्रवासी होते.

हेही वाचा - दोन्ही लस घेतल्या असतील तरच मिळेल दारु, या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

Last Updated : Sep 28, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.