यवतमाळ - केळापूरमधील प्रसिद्ध श्री जगदंबा संस्थान येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोना संकटामुळे कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नसून, दुरूनच देवीच्या मुखदर्शनाची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. केळापूर येथील जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी घटस्थापनेच्या काळात महाराष्ट्रासोबतच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून भाविक गर्दी करत असतात. मात्र यावेळी कोरोनामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट असल्याचे पहायला मिळत आहे.