ETV Bharat / state

यवतमाळ : आकाशवाणी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन - यवतमाळ ताज्या बातम्या

उमरखेड येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश प्रसारभारतीने दिले आहेत. हे केंद्र बंद करण्यापूर्वी आकाशवाणी केंद्र सुरु करा या मागणीसाठी आज प्रहारतर्फे आंदोलन करण्यात आले.

yavatmal latest news
yavatmal latest news
author img

By

Published : Sep 1, 2021, 12:29 AM IST

यवतमाळ - उमरखेड येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश प्रसारभारतीने दिले आहेत. त्यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड यांनी दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्यापूर्वी येथील मंजूर झालेले आकाशवाणी केंद्र सुरू करा, या मागणीसाठी आज टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया

टॉवरवर चढून प्रहारचे आंदोलन -

हे आकाशवाणी केंद्र 3 फेब्रुवारी 2015 मध्ये मंजूर झाले असून उमरखेड आणि हिंगोलीसाठी तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी प्रयत्न करून आकाशवाणी केंद्र आपल्या लोकसभा मतदारसंघात खेचून आणले. त्यापैकी हिंगोली येथील आकाशवाणी केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. तर उमरखेड येथे अजून कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यातच येथे असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय सूचना व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. याला आता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला असून हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याच्या अगोदर येथील मंजूर असलेले आकाशवाणी एफएम केंद्र सुरू करावे व नागरिकांना सुविधा पुरवाव्यात याकरिता प्रसार भारतीला निवेदन देऊन प्रहारने विनंती केली होती. मात्र याकडे दुर्लेक्ष केल्याने प्रहारचे कार्यकर्ते सय्यद माजिद सय्यद पाशा, अविनाश दुधे, प्रवीण इंगळे दूरदर्शन प्रशिक्षण केंद्राच्या टॉवरवर चढले होते. तसेच आंदोलना दरम्यान अंकुश पानपट्टे, अभिजित गंधेवार, विवेक जळके, मोहम्मद फयाज, शाम चैके गोपाल झाडे, मनोज कदम व आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते दूरदर्शन केंद्रावर ठाण मांडून बसले होते.

13 ऑगस्ट रोजी केली होती मागणी -

केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या माध्यमातून 13 ऑगस्टला रोजी या संदर्भातील मागणी करण्यात आली होती. 31 ऑगस्ट हे प्रक्षेपण केंद्र बंद होत असल्याने तालुक्यातील अनेक टीव्ही संचावर यापुढे दूरदर्शनचे थेट कार्यक्रम दिसण्यास अडथळा निर्माण होणार आहे. तसेच 2015मध्ये मंजूर झालेल्या एफएम केंद्राला सहा वर्षानंतरही सुरुवात झाली नाही. यात मनोरंजन कृषी विषयक माहिती, बातम्या व कोरोना महामारी शाळा बंद झाल्यामुळे दूरदर्शनच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे.

हेही वाचा - ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका नको, राष्ट्रवादीची भूमिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.