ETV Bharat / state

शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही - माणिकराव ठाकरे - महाविकास आघाडी

महाविकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षाच्या जिल्हाप्रमुख यांनी एकत्र बसून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. शेवटी कार्यकर्त्यांवरच पक्ष मोठा होत असतो. अशा वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने काँग्रेसला सापत्न वागणूक देणे योग्य नाही, असेही मत जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

माणिकराव ठाकरे
माणिकराव ठाकरे
author img

By

Published : Aug 10, 2021, 7:59 AM IST

यवतमाळ - राज्यात महाविकास आघाडी आहेत. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेकडून या महाविकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही. शिवसेनेकडून काँग्रेसला सापत्न वागणूक देण्यात येते. जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात सेनेचा एकच आमदार असताना सेना मोठ्या प्रमाणात तिथे लुडबूड करते. जिल्हा स्तरावर असलेल्या विविध समित्यांवर सेनेचे पदाधिकारी घेतल्या जातात अशी तक्रार यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली केली. माणिकराव ठाकरेच्या वक्तव्याने जिल्ह्यात महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा स्पष्ट झाले आहे.

माणिकराव ठाकरे
तीनही पक्षप्रमुखांनी एकत्र बैठक घेण्याची वेळमहाविकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षाच्या जिल्हाप्रमुख यांनी एकत्र बसून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. शेवटी कार्यकर्त्यांवरच पक्ष मोठा होत असतो. अशा वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने काँग्रेसला सापत्न वागणूक देणे योग्य नाही, असेही मत जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. मंगळवारी जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार आले होते. काँग्रेसचा इतिहास पुसण्याचे विरोधकांचे षडयंत्र काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. महात्मा गांधी यांनी देशाला विचार दिला. समानता, समाजवाद रुजविण्यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचा इतिहास पुसण्याचे विरोधकांचे षड्यंत्र रचल्या जात आहे. त्याला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने दिले पाहिजे, अशा शब्दात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा - हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं - नीरज चोप्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.