यवतमाळ - लोकशाहीचे खरे शत्रू हे दुसरे कोणी नाही तर भाजप-शिवसेनेचे सरकार आहे, असा आरोप येथील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी येथे प्रचारादरम्यान केला. ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय याप्रकारच्या विचारसरणीची जपणूक करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - एकनाथ खडसेंना व्हायचंय पंतप्रधान!
कायद्याने खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे मात्र बीजेपी शिवसेना ही लोकशाहीचा शत्रू असून ही लोकशाही टिकविण्यासाठीचा लढा देण्यासाठी ही निवडणूक असल्याचे ते बोलले. सर्वसामान्य जगा आणि जगू द्या हे तत्व लोकशाहीने स्वीकारले आहेत. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन प्रा. वसंत पुरके यांनी केले.
हेही वाचा - शरद पवारांनी 15 दिवसात घेतल्या 60 सभा अन् दोन रॅली
सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी स्वातंत्र्य मिळावे यासाठी माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रस्ते वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नांवर मी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. मात्र, या सरकारने पत्रकारांना मारहाण केली, गुणवंतांना मारहाण केली असा आरोप करत अशा प्रकारची दडपशाही मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - आता 'लोकांचंच ठरलंय', कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच - शरद पवार
भाजप-सेनेच्या मागील 5 वर्षाच्या काळात सामान्य जनतेच्या जगण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. एक प्रकारची दडपशाही या राजवटीत असून सामान्य जनता त्रस्त झाली आहे, असेही त्यांनी म्हटले. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांनी प्रचार करीत मतदारांना आवाहन करत आशीर्वाद मागितले.