ETV Bharat / state

पीकविमा कंपन्यांविरोधात यवतमाळमध्ये शिवसेनेचे आंदोलन - Yavatmal District Latest News

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या पीकविमा कपंन्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारून, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.

Yavatmal District Latest News
यवतमाळमध्ये शिवसेनेचे आंदोलन
author img

By

Published : Dec 28, 2020, 6:05 PM IST

यवतमाळ - यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या पीकविमा कपंन्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारून, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. सोमवारी भावना गवळी यांच्या नेतृत्वात पीकविमा कंपन्यांविरोधात जबाब दो आंदोलन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यादरम्यान आंदोलकांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.

यवतमाळमध्ये शिवसेनेचे आंदोलन

न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणार

यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचा चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला. मात्र, त्यातील केवळ 9777 शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला आहे. विमा कंपनीने 158 कोटी रुपये फस्त केल्याचा आरोप गवळी यांनी यावेळी केला. दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या सर्वेनुसार, विमाभरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी इफको-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर सचिन सुरोशे यांना घेराव घातला. आक्रमक झालेल्या शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी मॅनेजरच्या अंगावर सोयाबीन टाकून त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. दरम्यान याप्रकरणी आपण न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणार असल्याचे गवळी यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.