ETV Bharat / state

ज्येष्ठ, निराधार, अपंगांची देवदूत; शीला मिर्झापुरेंचा खास उपक्रम 'सेवा माता-पित्यांची'

author img

By

Published : May 6, 2021, 9:57 PM IST

लॉडाऊनमुळे अनेक वृध्द, अपंग, निराधार नागरिकांचे हाल होत आहेत. पण, यवतमाळच्या शीला मिर्झापुरे अशा लोकांसाठी देवदूत ठरत आहेत. त्यासाठी शीला यांनी 'सेवा माता-पित्यांची' हा उपक्रम सुरू केला आहे. शीला आपल्या चमुच्या सहाय्याने गरजूंच्या घरी जीवनावश्यक साहित्य पोहोच करत आहेत. यामुळे अनेक लोक त्यांना आपल्या मुलीचा दर्जा देत आहेत.

yavatmal
यवतमाळ

यवतमाळ - कोरोना काळात ज्येष्ठ, निराधार, अपंग, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी यवतमाळ मधील शीला मिर्झापुरे या महिलेने नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू केला. याचे नाव आहे 'सेवा माता-पित्यांची'. या उपक्रमाअंतर्गत शीला आपल्या चमुच्या सहाय्याने गरजूंच्या घरी जीवनावश्यक साहित्य पोहोच करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शीला मिर्झापूरेंचा खास उपक्रम 'सेवा-माता पित्यांची

यांना बसतोय लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वात जास्त फटका निराधार, अपंग किंवा वयस्कर लोकांना बसत आहे. कित्येकजण असे आहेत की ज्यांना मुलं-बाळं नाहीत. काहींना अपंग मुलं आहेत. अशा स्थितीत या वयस्करांना शारीरिक दृष्ट्या शक्य ती कामं करून संसार चालवावा लागत आहे. आता वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांना मदतीची गरज आहे. हे ओळखून यवतमाळ मधील शीला मिर्झापुरे या महिलेने 'सेवा माता पित्यांची' हा उपक्रम सुरू केला आहे.

70 गरजू कुटुंबांना मदत

शीला मिर्झापुरे या उपक्रमांतर्गत गरजूंना धान्य, लागणारी औषधं; पाण्याचे आणि इतर कुठलेही बिल भरायचे असेल तर त्या ही सर्व कामे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून करत आहेत. एवढेच नाही तर आजारी लोकांनी मदत मागितली तर त्यांच्या टीम मधील डॉक्टरसुद्धा या निराधारांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून मदत करतात. पतीच्या निधनानंतर शीला मिर्झापुरे यांच्यावर त्यांच्या सासू, सासरे यांना सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यावेळीच्या परिस्थितीतून त्या बरेच काही शिकल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात एकट्या पडलेल्या लोकांना मदत करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. आतापर्यंत जवळपास 70 गरजू कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे. यामुळे गरीब, निराधार आणि वयस्कर लोक शीला मिर्झापुरेंना आपल्या मुलीचा दर्जा देत आहेत.

शीला यांच्यासोबत डॉक्टर महिलाही जुळल्या

कमलाबाई मगर या 78 वर्षाच्या आजी यवतमाळच्या लोहारा परिसरात राहतात. त्यांना एक अपंग मुलगा आहे. त्यांचे पती मोलमजुरी करतात. आजी लोकांच्या घरची भांडी धुवून त्या कसेतरी कुटुंब सांभाळतात. आता कोरोनाच्या काळात त्यांनी घराबाहेर पडू नये, म्हणून शीला यांनी त्यांना मदतीचा हात दिला. या उपक्रमात आता शहरातील काही डॉक्टर महिला जुळल्या आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम स्वीकारले आहे. आपल्या वृध्द आई वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ज्या कुटुंबात तरुण व्यक्ती नाही. अशा लोकांच्या घरी जाऊन शीला यांच्या टीम मधील डॉक्टर सेवा देत आहेत.

हेही वाचा - ग्राहकांना दिलासा : महानंद दूध दोन रुपयांनी स्वस्त

हेही वाचा - मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.