ETV Bharat / state

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा 75 वर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी आणखी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 75 वर पोहोचली आहे. यवतमाळमध्ये कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या इंदिरानगर, मेमन कॉलनी या भागात मागील पाच दिवसात 60 कोरोनाबाधित आढळले आहेत.

यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा 75 वर
यवतमाळमधील कोरोनाबाधितांचा आकडा 75 वर
author img

By

Published : Apr 29, 2020, 8:59 AM IST

Updated : Apr 29, 2020, 10:37 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी आणखी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 75 वर पोहोचली आहे.

यवतमाळमध्ये कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या इंदिरानगर, मेमन कॉलनी या भागात मागील पाच दिवसात 60 कोरोनाबाधित आढळले आहेत. यात 3 कुटुंबातील 40 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे, या भागातील 60 वर्ष आणि त्यावरील व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मधुमेह, रक्तदाब आणि अन्य समस्या असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी गर्दी करू नये तसेच प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन देवेंद्र सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह

गेल्या तीन दिवसांत एकूण 393 नमुने तपासणीकरता पाठविण्यात आले. यापैकी पूर्ण 393 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत तपासणीकरता पाठवलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1 हजार 150 आहे. संस्थात्मक विलगीकरणात 195 तर गृह विलगीकरणात एकूण 837 जण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिली.

Last Updated : Apr 29, 2020, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.