ETV Bharat / state

पावणेदोन लाखांचे बोगस बीटी बियाणे जप्त; कृषी विभागाचे कारवाई - यवतमाळमध्ये बोगस बीटी बियाणे जप्त

वनी तालुक्यातील पुरड येथील एका घरामध्ये शंकर लकडे याच्या घरी धाड टाकून 1 लाख 85 हजार614 रुपये किंमतीचे 242 बोगस बीटी बियान्याची पॅकेट्स जप्त करण्यात आले असून संबंधितावर शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Action of the Department of Agriculture
यवतमाळमध्ये कृषी विभागाचे कारवाई
author img

By

Published : May 6, 2021, 5:24 PM IST

यवतमाळ - वनी तालुक्यातील पुरड येथील एका घरामध्ये अनाधिकृत बीटी बियाणे विक्रीसाठी आणल्याची माहिती कृषी विभाग व शिरपूर पोलीस ठाण्याला मिळाली. या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शंकर लकडे याच्या घरी धाड टाकून 1 लाख 85 हजार614 रुपये किंमतीचे 242 बोगस बीटी बियान्याची पॅकेट्स जप्त करण्यात आले असून संबंधितावर शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

यवतमाळमध्ये कृषी विभागाचे कारवाई

घर झडतीत आढळले बियाने

कृषी विभागच्या अधिकाऱ्यांनी घरातील मधल्या खोली मध्ये पांढ-या पोत्यामध्ये अनाधिकृत कापुस बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक केले असल्याचे आढळून आले. यात
गोल्ड 659WG (100 पाकीटे), 155-4G (100 पाकीटे), R-659-(14 पाकीटे), बिल्ला 999 (13 पाकीटे), राघवा 39-(15 पाकीटे) असे एकुण 242 पाकीटे अनाधिकृत कापूस बियाण्याचे पाकीटे जप्त करण्यात आली.

15 पॅकेट तपासणी करिता लॅबमध्ये

जप्त केलेल्या मुद्देमालातील गोल्ड 659WG (03 पाकीटे), 155-4G - (03 पाकीटे), R-659-(3 पाकीटे), बिल्ला-999-(3 पाकीटे), राघवा-39-(3 पाकीटे )असे एकुण 15 पाकीटे विस्लेषणाकरीता बिज परिक्षण प्रयोगशाळा तपासणी करण्याकरीता घेण्यात आले व एकुण 227 पाकीटे पोलीस स्टेशन शिरपुर जमा करण्यात आले. खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात 17 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा - साठ टक्के पीक कर्जवाटप मे अखेरपर्यंत करा; जिल्हाधिकारी येडगे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.