ETV Bharat / state

यवतमाळमध्ये नाल्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू - यवतमाळ शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू बातमी

जय शंकर गायकवाड (वय १२ वर्ष रा.राधाकृष्ण नगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लहान वडगाव मधील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. तो सोमवारी सकाळी शाळेत गेला. मात्र शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला. त्याचे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरिता गेला असता पाय घसरुन पडला.

school students died due to drowned in nala at yavatmal
यवतमाळमध्ये नाल्यात बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 20, 2022, 3:39 PM IST

Updated : Jul 20, 2022, 9:43 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाल्याने नदी झाले तुडुंब भरले आहे. या दरम्यान यवतमाळ शहरातील नाल्यावर शाळेकरी मुलगा पाय धुण्याकरता गेला असता तो पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

पाण्यात बुडून मृत्यू - शहरातील राधाकृष्ण नगर जांब रोड परिसरामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना दिनांक १८ जुलै २०२२ सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. जय शंकर गायकवाड (वय १२ वर्ष रा.राधाकृष्ण नगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लहान वडगाव मधील देवराव भाऊराव पाटील या शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. तो सोमवारी सकाळी शाळेत गेला. मात्र शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला. त्याचे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरिता गेला असता पाय घसरुन पडला. यावेळी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

Last Updated : Jul 20, 2022, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.