ETV Bharat / state

गुणवंताचे रक्षण करा : 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे यवतमाळमध्ये घंटानाद आंदोलन

राज्यसरकारने काही समाजांना आरक्षण देऊन 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून ती 78 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी दत्त चौकात पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानाजवळ 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' कृती समितीच्या वतीने  घंटानाद आंदोलन करण्यात आले.

गुणवंताचे रक्षण करा : 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे यवतमाळमध्ये घंटानाद आंदोलन
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:44 PM IST

यवतमाळ - राज्यसरकारने काही समाजांना आरक्षण देऊन 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून ती 78 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे 78 टक्केतील खुला प्रवर्ग आता 22 टक्केवर पोहोचला आहे. तरीही या 22 टक्यामध्येसुद्धा आरक्षण असलेला समाज अर्ज करत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी दत्त चौकात पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानाजवळ 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

गुणवंताचे रक्षण करा : 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे यवतमाळमध्ये घंटानाद आंदोलन

आंदोलकांना पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या अलीकडेच रोखण्यात आले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसरकारने मॅनेजमेंटच्या जागा कमी करून खुल्या प्रवर्गात जागा वाढविल्या असल्याचे सांगितले. तसेच आपली मागणी सरकारपर्यंत पोहचतो असे आंदोलकांना आश्वासन दिले.

सध्या राज्यात सर्व समाज आरक्षण मागत आहेत. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. म्हणून, सरकारने या मागणीबाबत लवकरच सकारात्मक विचार करावा, अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महामोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Intro:गुणवंताचे करा रक्षण; ५० टक्के पेक्षा नको जास्त आरक्षण
यवतमाळ मध्ये नागरिकाचे घन्टा नाद आंदोलन Body:यवतमाळ : सध्या राज्यात सर्व समाज आरक्षण मागत आहेत. नुकतेच सरकरने काही समाजाला आरक्षण जाहीर केले. यामुळे राज्यसरकारने आरक्षण देऊन ५० टक्क्याची मर्यादा ओलांडली असून ते आता ७८ टक्क्यावर पोहचले आहेत. एकेकाळी सहनशील असलेला ७८ टक्के खुला प्रवर्ग आता २२ टक्के वर पोहचला असून या २२ टक्यात सुद्धा आरक्षणात असलेला समाज अर्ज करतोय. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना डावलले जात आहे. या आरक्षणाच्या टक्केवारीत गुणवंत लोक मागे पडत असून त्याची कदर सरकार न करता आरक्षण देत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी दत्त चौकात पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानाजवळ सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या कृती समिती कडून घंटा नाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. आंदोलकांना पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या अलीकडेच थांबविण्यात आले. आणि त्या ठिकाणी खुद्द पालकमंती मदन येरावार यांनी येऊन आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन निवेदन घेतले. शिवाय या बाबत राज्यसरकारने मॅनेजमेंटच्या जागा कमी करून खुल्या प्रवर्गात जागा वाढविल्या असल्याचे सांगितले. तरी देखील आपले म्हणणे मी सरकार पर्यंत पोहचतो असे सांगून आश्वस्त केले.
सरकारने या मागणी बाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा ९ ऑगस्ट क्रांती दिनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन मोहमी अंतर्गत महामोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

बाईट - अशोक भंडारी - संयोजक
बाईट - डॉ अपर्णा बाहेती - Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.