ETV Bharat / state

यवतमाळमध्ये परतीच्या पावसाचा फटका.. शेतकऱ्यांनी भाजीपाला टाकला जनावरांना - यवतमाळमध्ये परतीच्या पावसाचा फटका

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाजी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे खराब भाजीपाला शेतकऱ्यांनी जनावरांसमोर टाकला आहे.

Return rains hit Yavatmal
Return rains hit Yavatmal
author img

By

Published : Mar 24, 2021, 10:13 PM IST

Updated : Mar 24, 2021, 10:20 PM IST

यवतमाळ - मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे शेतातील भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. संपूर्ण भाजीपाला खराब झाला. तर कोरोनामुळे भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याने शेतातील, कोबी, चवळी, वांगे, घोळ हे भाजीपाला पीक दिग्रस तालुक्यातील देवनगर भागातील गजानन चीरडे आणि भाऊराव दुधे या दोन शेतकऱ्यांनी जनावरांसमोर टाकला आहे.

शेतकऱ्यांनी भाजीपाला टाकला जनावरांना
कुणाच्या तरी पोटात जावे -
परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मातेरे केले. तर रब्बी हंगामात आपल्याला पदरी काही तर पैसे मिळतील. या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला. पण त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे दिसून येत आहे. गजानन चीरडे आणि भाऊराव दुधे या दोघा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वादळी पाऊस आणि कोरोनामुळे बाजारभाव मिळत नाही. शेवटी कंटाळून शेवटी या शेतकऱ्यांनी भाजीपाला कोणाच्या तर पोटात जावा. या हेतूने यांच्या शेतातील भाजीपाला म्हणजेच कोबी, वांगे, घोळभाजी, चवळी गोरक्षणातील जनावरांना दान केला आहे. दान करत खर्च जास्त आणि उत्पन्न शून्य असल्या कारणाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Last Updated : Mar 24, 2021, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.