ETV Bharat / state

स्तुत्य उपक्रम : महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही... - मनोरुग्ण सेवा यवतमाळ

रस्त्याने फिरणाऱ्या महिला किंवा पुरुष मनोरुग्णाला हे सदस्य पकडतात. रुग्णांना खाद्यपदार्थ किंवा पैशाचे आमिष देतात आणि आपल्या कार्यालयावर आणतात. त्याठिकाणी त्यांची अंघोळ घालून देतात, त्यांना नवीन कपडे घालून देतात. हे सर्व करत असताना हे मनोरुग्ण खूप त्रास देतात. कधी कधी ते शिव्याही देतात. अशा ही स्थितीत या महिलांनी आपले कार्य चालूच ठेवले आहे.

महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...

author img

By

Published : Jan 25, 2020, 7:19 PM IST

यवतमाळ - मनोरुग्ण म्हटले तर अनेकजण त्यांच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, शहरातील प्रतिसाद फाऊंडेशनच्या महिलांनी संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून या मनोरुग्ण तरुणांची सेवा करण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे त्यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

रस्त्याने फिरणाऱ्या महिला किंवा पुरुष मनोरुग्णाला हे सदस्य पकडतात. रुग्णांना खाद्यपदार्थ किंवा पैशाचे आमिष देतात आणि आपल्या कार्यालयावर आणतात. त्याठिकाणी त्यांची अंघोळ घालून देतात, त्यांना नवीन कपडे घालून देतात. हे सर्व करत असताना हे मनोरुग्ण खूप त्रास देतात. कधी कधी ते शिव्याही देतात. अशा ही स्थितीत या महिलांनी आपले कार्य चालूच ठेवले आहे.

स्तुत्य उपक्रम : महिला करतात मनोरुग्णांची सेवा, त्यांना आंघोळ घालणे, उपचार अन् बरंच काही...

मनोरुग्णांना कोणीही जवळ घेत नाही. त्यांना नातेवाईक सुद्धा नाकारतात. अशावेळी या महिला मनोरुग्णांना आपले नातेवाईक समजून मदतीचा हात देत आहेत. सख्ख्या नातेवाइकाप्रमाणे वागणूक देत आहेत. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे या महिला त्यांची सेवा करीत असतात. मात्र, हे काम करत असताना काहीजण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. मात्र, त्यांची चिंता न करता या महिलांनी हे कार्य सुरू ठेवले आहे. या मनोरुग्णांवर यवतमाळमधीलच रुग्णालयात उपचार केले जात आहे. हे काम करण्यासाठी त्यांना कुटुंबीयांचे देखील तेवढेच पाठबळ मिळते. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळते.

दिवसेंदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणीतरी काम करावे म्हणून प्रतिसाद फाउंडेशनने पाऊल उचलले आहे. सेवा प्रतिसाद फाउंडेशनच्या सदस्यांनी आतापर्यंत साडेचारशे ते पाचशे मनोरुग्णांची सेवा केली. मनोरुग्णांना पकडून त्यांना आंघोळ घालणे, त्यांना रुग्णालयात नेऊन उपचार करणे आणि पुनर्वसनाच्यादृष्टीने वृद्धाश्रमात पाठविणे हे काम या फाऊंडेशनचे सद्स्य करीत असतात. समाजाने सुद्धा आता या मनोरुग्णांच्या सेवेसाठी आमच्या पाठिशी उभे राहावे. तसेच त्यासाठी शक्य ती मदत करावी. मनोरुग्णाच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रतिसाद फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Intro:Body:यवतमाळ : सध्या तीळ संक्रांतीचा सण महिला वर्ग मोठ्या उत्साहाने साजरा करत असतांना यवतमाळतील प्रतिसाद फाउंडेशनच्या महिला मात्र, या सणाचे औचित्य साधून हा उत्सव अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. या महिलांचा हा हृदयस्पर्शी उपक्रम सर्वासाठी आदर्श ठरणार आहे.
मनोरुग्ण म्हंटल कि भल्या भाल्याची त्रेधा उडून जाते. त्यांच्या पासून कोणीही चार हात दूरच राहतात. असे रुग्ण नेमकं केव्हा काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही. अशा स्थितीत यवतमाळच्या प्रतिसाद फाउंडेशनच्या महिलांनी आणि तरुण सदस्यांनी तीळ संक्रांतीचे अवचितये साधून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा अत्यंत भावनिक उपक्रम हाती घेतला. रस्त्याने फिरणाऱ्या महिला किव्वा पुरुष मनोरुग्णाला हे सदस्य पकडतात. त्यासाठी बरेच वेळा रुग्णांना खाण्याचे पदार्थ्यांचे, पैशाचे अमिश देतात आणि आपल्या कार्यालयावर आणतात. त्याठिकाणी त्यांची अंघोळ घालून देतात, त्यांना नवीन कपडे घालून देतात. हे सगळं करत असतांना हे मनोरुग्ण खूप त्रास देतात. कधी कधी ते चावतात आणि शिव्याही देतात. अशा हि स्थितीत या महिला आपलं कार्य चालूच ठेवत आहे.

जीवन जगात असतांना समाजच काही तरी देणं लागते. या ऊद्देशाने प्रतिसाद च्या महिला नि समाज सेवेचं व्रत हाती घेतलं. मनोरुग्णना कोणीही जवळ घेत नाही. त्यांना नातेवाईक सुद्धा नाकारतात. अशा वेळी या महिला मनोरुग्ननं आपले नातेवाईक समजून मदतीचा हात देत आहे. सक्ख्या नातेवाइकाप्रमाणे वागणूक देत आहे. घरातील एखादी व्यक्ती आजारी असतांना आपण जे करायला पाहिजे तेच मनोरुग्णासाठी सुद्धा करत आहे. समाजाने सुद्धा आता या रुग्णांच्या सेवेसाठी आमच्या पाठीशी राहावं तसेच शक्ये ती मदद करावी. अशी अपेक्षा प्रतिसादच्या महिला व्यक्त करत आहे.

देवळात देव नसून तो माणसात आहे . या उद्दात्ये हेतूने फाउंडेशनचे सदस्य मनोरुग्णाची सेवा करत आहे. हे काम करत असतांना सामान्य नागरिक त्याच्या कडे वेगळ्याच हेतून पाहतात. मात्र हे सदस्य त्याची मुळीच चिंता करत नाही. उलट जास्त जिद्दीने काम करतात त्यात त्यांना वेगळंच समाधान मिळत आहे. सुरुवातील मनोरुग्णावर यवतमालातीलच दवाखान्यात उपचार केले जात आहे . हे सर्व करत असतांना महिलांना आपल्या घरून सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे. घरातील लोकांचा विश्वासाच्या जोरावरच या महिला अधिक वेगाने काम करत आहे.

दिवसेंनदिवस मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या लोकांच्या पुनर्वसन व्हावे, त्यांच्यासाठी कोणीतरी काम करावं म्हणून प्रतिसाद फाउंडेशन ने पाऊल उचलले आहे. आता पर्यंत साडेचारशे ते पाचशे मनोरुंगणाची सेवा प्रतिसाद फाउंडेशनच्या सदस्यांच्या हातून झाली. ज्या जागेवर कोणताही सर्वसाधारण माणूस जाण्याची हिम्मत करणार नाही. अशा ठिकाणावर पडून असलेल्या मनोरुग्णांना पकडून त्यांची अंघोळ घालणे, त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊन उपचार करणे, आणि नंतर पुनर्वसनाच्या दृष्टीने वृद्धाश्रमात पाठविणे हे काम फाउंडेशन करत आहे. मनोरुग्णच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रतिसाद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

ज्यांना रक्ताचे नातेवाईक नाकारतात. समाज हि नाकारते अशा लोकांच्या मदतीला आणि पुनर्वसनासाठी धावून जाण्याचा जो मार्ग प्रतिसाद ने स्वीकारला तो भल्या भल्यांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे.

बाईट - गीता रिठे
बाईट- दीपाली धबाले
बाईट- मनोज गुल्हाने, अध्यक्ष प्रतिसाद फाउंडेशन Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.