यवतमाळ - आसेगाव येथे गावठी दारू नेणाऱ्या साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गावकऱ्यांनी रंगहाथ पकडले आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षक यावेळी 'ऑन ड्युटी' होता. गावकऱ्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या कर्मचाऱ्याला पकडून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले.
वाघमारे असे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचे निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. संचारबंदी लागू झाल्यावर याच आसेगावात स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकाऱयांनी छापा टाकून 300 लिटर गावठी दारू व सडवा नष्ट केला होता. यावेळी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा या गावात गावठी दारू सुरू झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांचा या कृत्यात सहभाग असल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय गावकऱ्यांना आलाय.