ETV Bharat / state

Yavatmal Crime: पोलीस स्टेशन हद्दीत कोंबड बाजारावर पोलिसांची धाड, सात आरोपींना अटक - Mukutban Police Station

Yavatmal Crime: मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत Mukutban Police Station येत असलेल्या अडेगाव शिवारात खुल्या मैदानात सूरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड मारली.

Yavatmal Crime
Yavatmal Crime
author img

By

Published : Nov 20, 2022, 11:09 AM IST

यवतमाळ: जिल्ह्यातील मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत Mukutban Police Station येत असलेल्या अडेगाव शिवारात खुल्या मैदानात सूरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड मारली. यामध्ये 7 आरोपींना रंगेहात अटक केली असून 2 लाख 12 हजार 500 रूपयांचा मूदे्माल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपी: अमोल आनंदराव मत्ते (वय 42) रा. आनंदनगर वणी, सुनिल अशोक आवारी (वय 48) रा. अडेगाव ता झरी, बाबाराव नानाजी हिवरकर (वय 48), वामन अर्जुन धानोरकर (वय 40), विठ्ठल उध्दव झाडे (वय 51) तिघेही राहणार अडेगाव ता झरी, शिवराम गुलाब गिरसावळे ( वय 60) रा डोंगरगाव ता.झरी, निलेश लक्ष्मण आत्राम (31) रा. रामपुर ता झरी जि. यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संबधीत आरोपी 2 कोंबडे ज्याचे पायास धारदार टोकदार काती लावून त्यांची झुंज खेळवून पैशाचा हारजितचा जुगार खेळतांना रंगेहात मिळून आले आहेत.

पोलीस स्टेशन हद्दीत कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

2 लाख 12 हजाराचा मुदे्माल जप्त: दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीं झडती घेतली असता, त्यामध्ये 1 हजार 400 रुपये नगदी तसेच एक जिवंत कोबडा, दोन टोकदार काती, 7 दुचाकी वाहने असा एकूण 2 लाख 12 हजाराचा मुदे्माल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम गंगाधर घोडाम यांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यांनी ही कारवाई केली: ही कार्यवाही डॉ पवन बन्सोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली अनिल सकवान पोलीस उपनिरीक्षक, खुशाल सुरपाम ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, पुरुषोत्तम घोडाम ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार संजय खांडेकर संदिप कुमरे पोलीस स्टेशन मुकूटबन यांनी ही कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.