ETV Bharat / state

टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे - Water Supply Yavatmal Collector Suggestion

मागील दोन्ही वर्षी सारखाच पाऊस झाला असताना या वर्षी टँकरची संख्या जास्त का? टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा. तसेच, चालू असलेले टँकर कमी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी उपलब्ध आहे, पण ते वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी येऊ देऊ नका, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Water Supply Yavatmal Collector Suggestion
पाणी पुरवठा यवतमाळ अमोल येडगे सूचना
author img

By

Published : May 10, 2021, 7:51 PM IST

यवतमाळ - मागील दोन्ही वर्षी सारखाच पाऊस झाला असताना या वर्षी टँकरची संख्या जास्त का? टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे नियोजन करा. तसेच, चालू असलेले टँकर कमी किंवा बंद करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी उपलब्ध आहे, पण ते वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी येऊ देऊ नका. यवतमाळ पालिका क्षेत्रात नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. ते पाणी टंचाई निवारणाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

पाणी टंचाईचे दृश्य

हेही वाचा - एक दिवसात 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 1032 जण पॉझिटिव्ह, 36 मृत्यू

तसेच, अमृत योजनेच्या कामाची डेडलाईन 1 जुलैपर्यंत ठरविण्यात आली आहे. तोपर्यंत अमृत योजनेचे काम चाचणीसह पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी सतत पाठपुरावा करा. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाच्या नेहमी संपर्कात राहा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. बैठकीत महावितरण, नगरपालिका, जिल्हापरिषद, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टंचाई निवारणासाठी गांभिर्याने काम करा

2019 आणि 2020 या दोन्ही वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात टँकरची संख्या जास्त आहे. टँकर आणि विहीर अधिग्रहणाची आवश्यकताच पडू नये, असे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे, यापुढे टंचाई निवारणार्थ गांभीर्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

२६ गावांत 26 टँकर सुरू

तसेच नळ योजना विशेष दुरुस्तीची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. माळ पठारावर किती टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरची संख्या कधीपर्यंत कमी होईल, याबाबतही त्यांनी विचारणा केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 गावांत 26 टँकर सुरू असून 115 गावात 109 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे यांनी बैठकीत दिली.

हेही वाचा - यवतमाळ : ८८५ दिव्यांग महिला व कुटुंबीयांसाठी स्वयंरोजगार योजना; राज्यातील पहिलाच प्रयोग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.