ETV Bharat / state

सोशल डिस्टन्सींगचा फज्जा; जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी नागरिकांची बँकेसमोर तोबा गर्दी

नागरिक पैसे काढण्यासाठी बँक आणि ग्राहक सेवा केंद्रात गर्दी करीत आहेत. यात कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही.

Yawatmal
पैसे काढण्यासाठी लागलेली महिलांची रांग
author img

By

Published : Apr 16, 2020, 10:04 AM IST

यवतमाळ - केंद्र शासनाने लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक पैसे काढण्यासाठी बँक आणि ग्राहक सेवा केंद्रात गर्दी करीत आहेत. यात कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. याठिकाणी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र बँकेसमोर नागरिक सकाळी 5 वाजतापासून रांगेत उभे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सोशल डिस्टन्सींगचा फज्जा; जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी नागरिकांची बँकेसमोर तोबा गर्दी

मागील तीन दिवसांपासून बँक बंद होत्या. तर 14 एप्रिलला पुन्हा सुट्टी आली. त्यामुुळे बुधवारी मोठ्या प्रमाणात नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये आले. ग्राहक सेवा केंद्रावर तर नागरिकांना टोकण पद्धतीने नंबर लावण्यात आला. त्यामुळे सकाळी 5 वाजतापासून नागरिक रांगेत आहेत. अनेकजण टोकन घेऊन आज पुन्हा पैसे काढण्यासाठी येणार आहेत. काही नागरिकांनी झाडाखाली थांबून आपला नंबर केव्हा लागेल याची प्रतीक्षा करत होते. कोरोना संसर्गामुळे मजूरवर्ग, शासनाच्या विविध लाभाच्या योजनेचे लाभार्थी यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला हे यावरुन दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.