यवतमाळ - अवकाशामध्ये एखादा उपग्रह प्रक्षेपित करणे एक मोठे आव्हान असते. सात फेब्रुवारीला रामेश्वरम येथून एकाच वेळी शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील १०० विद्यार्थी या प्रक्षेपणाचे साक्षीदार होणार आहेत. या शंभर पैकी ३० विद्यार्थिनी जिल्ह्यातील पाटणबोरी येथील दुर्गम आदिवासी भागातले आहेत. या सर्व विद्यार्थिनींनी पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेंट अँड कॉलेज मध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांना डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्यूब चॅलेंज 2021 या मोहिमे अंतर्गत तर उपग्रह सोडण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थिनी करणार शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण आदीवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे आदिवासी विभागाच्या नामांकित योजने अंतर्गत येत असलेल्या आदिवासी निवासी आश्रम शाळेतील या विद्यार्थिनी आहेत. या सर्व विद्यार्थिनींचे पालक हे शेतकरी-शेतमजूर असून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत त्यांचा प्रवेश झाला आहे.
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थिनी करणार शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण लॉकडाऊन काळात घेतला स्पर्धेत सहभाग-लॉकडाऊन काळामध्ये हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने या उपक्रमाची आखणी केली होती. 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्यूब चॅलेंज 2021' असे या मोहिमेचे नाव आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय फाउंडेशन घेतला होता. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाच्या बाबतीत जिज्ञासा वाढेल, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, असा या मोहिमेमागील उद्देश होता.
देशभरातून एक हजार विद्यार्थी सहभागीया मोहिमेमध्ये देशभरातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार असून महाराष्ट्रातील 100 विद्यार्थ्यांची यात निवड करण्यात आली. त्यातही विशेष म्हणजे 100 जणांपैकी 30 जण एकट्या पाटणबोरीच्या रेड्डी कॉन्व्हेंट अँड कॉलेजमधून निवडण्यात आलेल्या आहेत. ही बाब यवतमाळ जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद आहे.
विद्यार्थ्यांना नागपूर येथे प्रशिक्षणमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुणे व नागपूर येथे प्रशिक्षण दिले जाणार असून जिल्ह्यातील या तीस विद्यार्थिनींना नागपूर येथील उपग्रहांची प्रत्यक्ष जुळवणी व कोडिंग याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण 22 जानेवारीपर्यंत दिले जाणार आहे.
सात फेब्रुवारीला रामेश्वर येथून प्रक्षेपणसात फेब्रुवारीला एकाच वेळी 100 उपग्रहांचे सायंटिफिक हेलियम बलूनद्वारे अंतराळात प्रक्षेपण केले जाणार आहे. यानंतर अंतराळातून पृथ्वीवर स्थापित केलेल्या केंद्राची कशाप्रकारे संपर्क होतो. अंतरातील ओझोनचा थर कार्बन डाय-ऑक्साइड व तत्सम बाबींचा ऑनलाईन अभ्यास करण्याचा अनुभव या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
या आहेत पाटणबोरीच्या बालवैज्ञानिक-या उपक्रमात पाटणबोरी येथील रेड्डीज कॉन्व्हेंट अँड कॉलेज मधील बाल वैज्ञानिक म्हणून मानसी घोडाम, वैजयंती चिकराम, सुप्रिया पांढरे,गौरी रेड्डी, वैष्णवी बोलचेट्टीवार, शुभांगी कुलसंगे, सुहानी घोडाम, पूजा पुसनाके, देवश्री आत्राम, दीक्षा धुर्वे, सरिता कोडापे, बेबी गेडाम, रेणुका कन्नाके, मयुरी पुसनाके, पूजा तुमराम, कुमार रेड्डी, भागचंद गोंड कोदोरी, पल्लवी मडावी, निखिल शाकाहार, रुपेश लकशेट्टीवार, दीक्षा गेडाम, प्रियंका आत्राम, दिव्या किनाके, निकिता घोडा घोडाम, साक्षी गेडाम, वैष्णवी कुमरे, जागृती पेंदोर, कीर्ती मडावी, पूनम नैताम यांचा समावेश आहे.