ETV Bharat / state

सुरक्षात्मक अग्निशामक यंत्रणा बसवून फायर ऑडिट करण्याचे आदेश - fire safety news

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत जिल्ह्यातील सार्वजनिक वापराच्या व वर्दळ असणाऱ्या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक अग्निशामक यंत्रणा तातडीने बसवून वेळोवेळी त्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.

yavatmal
yavatmal
author img

By

Published : Jan 21, 2021, 4:22 PM IST

यवतमाळ - भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात भविष्यात कोणतीही अघटीत घटना घडू नये, म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत जिल्ह्यातील सार्वजनिक वापराच्या व वर्दळ असणाऱ्या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक अग्निशामक यंत्रणा तातडीने बसवून वेळोवेळी त्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले.

फायर ऑडिट बंधनकारक

जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणाऱ्या शासकीय, निमशासकीय इमारतींचे जसे, की सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक, व्यापारी संकुले, सुपर बाजार, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये, निमशासकीय हॉस्पिटल्स, औद्योगिक क्षेत्र इत्यादी ठिकाणी सुरक्षात्मक अग्निशामक यंत्रणा बसवून त्याबाबतचे वेळोवेळी परीक्षण (फायर ऑडिट) करणे बंधनकारक असल्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

अहवाल देण्याचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायतयींचे मुख्याधिकारी, जिल्हा अग्निशामक अधिकारी यांनी शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.