यवतमाळ - राळेगाव तालुक्यातील वडकी-वडगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. जगदीश येरने (वय-२४ रा. उमरी, वर्धा) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
हेही वाचा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; एकाचा मृत्यू
जगदीश येरने हे वडकीकडून वडगावकडे दुचाकीने जात होत. त्याचवेळी रवींद्र वसंत ढाले हे वडगावकडून येत होते. वडकी येथील एका पोल्ट्री फार्मजवळ दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यात जगदीश येरने हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती वडकी पोलिसांना कळताच ठाणेदार विजय घुले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येरने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठवण्यात आला.