ETV Bharat / state

भरधाव ट्रकची मालवाहक जीपला धडक; एक जागीच ठार

author img

By

Published : Oct 31, 2019, 5:10 PM IST

आर्णी मार्गावर भरधाव ट्रकने मालवाहक जीपला जोरदार धडक दिल्याने जीपमालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त वाहने

यवतमाळ - भरधाव ट्रकने मालवाहक जीपला जोरदार धडक दिल्याने जीपमालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. ही घटना आज (गुरूवारी) पहाटे चार वाजता दरम्यान आर्णी मार्गावरील गुरुद्वारा जवळ घडली.

श्रीरंग पोतदार (रा. लातूर) असे मृत जीप मालकाचे नाव आहे. चालक मोतीनाथ सगर (रा. एकांबी, जि. लातूर) हा जखमी झाला. ते जीपमध्ये कोथिंबीर घेऊन लातूर येथून नागपूरकडे निघाले होते. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने वाहनाला धडक दिली. यात चालकाच्या बाजूला बसून असलेले श्रीरंग पोतदार यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.

अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात जीपचे दोन लाख आणि 55 हजाराचे कोथिंबीर असे एकूण दोन लाख 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी जीप चालक मोतीनाथ सगर याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ट्रक चालक सुशील ठाकूर (रा. शिवणी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Intro:Body:यवतमाळ : भरधाव वेगतील ट्रकने बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली. यात बोलेरो मालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. ही घटना पहाटे चार वाजता दरम्यान आर्णी मार्गावरील गुरुद्वारा जवळ घडली.

शिरंग पोतदार (जि. लातूर) असे मृत बोलेरो वाहनाच्या मालकाचे नाव आहे. चालक मोतीनाथ सगर(रा. एकांबी, जि. लातूर) हा जखमी झाला.बोलेरो वाहन कोथिंबीर घेऊन लातूर येथून नागपूरकडे निघाले होते. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने वाहनाला धडक दिली. यात चालकाच्या बाजूला बसून असलेले सिरंग पोतदार यांना गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातात वाहनाचे दोन लाख आणि 55 हजाराचे कोथिंबीर असे एकूण दोन लाख 55 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी चालक मोतीनाथ सगर याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ट्रक चालक सुशील ठाकूर (रा. शिवणी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.