ETV Bharat / state

यवतमाळमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू; 30 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात शनिवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. 30 कोरोना रुग्ण वाढले असून, त्यामध्ये 16 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. सध्या 157 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Yavatmal Corona Update
यवतमाळ कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 19, 2020, 7:03 AM IST

यवतमाळ-जिल्ह्यात शनिवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 17 वर पोहोचली. दिवसभरात 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी मृत्यू झालेला व्यक्ती ( 53) हा पुसद शहरातील दुधे ले-आऊट येथील रहिवासी होता. तसेच नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 16 पुरुष आणि 14 महिला आहेत. यात नेर शहरातील चिरडे ले-आऊट येथील 3 पुरुष व 3 महिला, नेर शहरातील जलाराम नगर येथील 1 पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील 1 पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील 1 महिला तसेच आणखी यवतमाळ येथील 2 पुरुष व 1 महिला, घाटंजी तालुक्यातील 4 पुरुष व 5 महिला, कळंब तालुक्यातील जोडमोह येथील 1 पुरुष, दिग्रस येथील 4 पुरुष व 4 महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत 144 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु होते. यात 30 जण नव्याने पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा 174 वर पोहोचला. मात्र, कोरोनामुक्त झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 157 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 100 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 57 जण आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 548 एवढी आहे. यापैकी 374 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 127 जण भरती आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9192 नमुने पाठविले असून यापैकी 8973 प्राप्त तर 156 अप्राप्त आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.