ETV Bharat / state

दूध विक्री करणारा हवा, की दारू विक्री करणारा तुम्हीच ठरवा - नीतीन गडकरी

बरबादीचा मार्गावर जायचे की विकासाच्या मार्गावर जायचे हे ठरवून मतदान करा, असे आवाहन नीतीन गडकरी यांनी केले आहे.

घाटंजी येथील प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 31, 2019, 9:14 PM IST

यवतमाळ - विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था हलाखीची आहे. शेतमालाला भाव नाही, प्रक्रिया उद्योग नाही. हे सत्य असले तरी सिंचनवाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी ५० टक्के शेतजमीन ओलिताखाली येईल त्यावेळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

घाटंजी येथील प्रचार सभेत बोलताना नितीन गडकरी

यवतमाळच्या घाटंजी येथे युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी गडकरींनी अहीर यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. दुधाचा व्यवसाय करणारे हंसराज अहिर हवेत, की दारू विक्री करणारा उमेदवार हवा. बरबादीचा मार्गावर जायचे, की विकासाच्या मार्गावर जायचे हे ठरवा. तसेच मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शाळा-महाविद्यालये उघडून मलिदा खाण्याचा धंदा आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे, असा घणाघात गडकरींनी यावेळी केला. सोनिया गांधी-शरद पवार यांनी वेगळीच रोजगार हमी राबवली आणि आपले खिसे भरले. अर्धे तुम्ही नि अर्धे आम्ही, असे धोरण काँग्रेसच्या राजवटीत सुरू होते, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारासाठी ते आज भद्रावती येथे आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या दारूच्या व्यवसायावरून टीका केली.

Intro:यवतमाळ : विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था हलाकीची आहे, शेतमालाला भाव नाही, प्रक्रिया उद्योग नाही हे सत्य असले तरी सिंचनवाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून ज्यावेळी ५० टक्के शेतजमीन ओलिताखाली येईल त्यावेळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. Body:यवतमाळच्या घाटंजी येथे युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी गडकरींनी अहीर यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्यावरही गडकरींनी अप्रत्यक्ष टोला हाणला, दुधाचा व्यवसाय करणारा हंसराज अहिर हवा की दारू विक्री करणारा उमेदवार हवा, बरबादीचा मार्गावर जायचं की विकासाच्या मार्गावर जायचं हे ठरवा आणि मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शाळा-महाविद्यालये उघडून मलिदा खाण्याचा धंदा आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.असा घणाघात भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला. सोनिया गांधी-शरद पवार यांनी वेगळीच रोजगार हमी राबवली आणि आपले खिसे भरले. अर्धे तुम्ही नि अर्धे आम्ही, असं धोरण काँग्रेसच्या राजवटीत सुरू होतं, असंही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारासाठी ते आज भद्रावती इथं आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या दारूच्या व्यवसायावरून टीका केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.