यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज (रविवार) जिल्ह्यात 25 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 19 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले 11 जण उपचाराअंती बरे झाल्यामुळे त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे.
रविवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांमध्ये 12 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तिरुपती नगर येथील एक पुरुष व दोन महिला, छत्रपती नगर येथील एक पुरुष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एक महिला, दारव्हा येथील दोन पुरुष, एक महिला, पुसद शहरातील पार्वती नगर येथील एक महिला, गांधी वॉर्ड येथील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील विठ्ठल नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील राम मंदीर परिसरातील एक महिला, वणी येथील एक महिला, उमरखेड येथील तीन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्डातील एक पुरुष आणि महागाव येथील एका पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहेत.
जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत 119 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. यात रविवारी 25 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 144 वर पोहोचला होता. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 11 जणांना सुट्टी मिळाल्यानंतर सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 133 झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 442 आहे. यापैकी 296 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्यूची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 7 हजार 4 नमुने पाठविले असून यापैकी 6 हजार 911 प्राप्त तर 93 अप्राप्त आहेत.