ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी ८ कोरोनाबाधित रुग्णांची भर, तिघांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू - corona numbers in yavatmal

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 87 रिपोर्ट प्राप्त झाले. यात आठ पॉझिटिव्ह आणि 79 रिपोर्ट निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 329 वर पोहोचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर, एका कोरोनाबधित रुग्णाचा झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी ८ कोरोनाबाधित रुग्णांची भर

author img

By

Published : Jul 6, 2020, 8:20 PM IST

यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी आणखी एका कोरोनाबधित रुग्णाचा झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा 12 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात आठ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आढळून आलेले तीनजण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय मृताचा समावेश आहे. तर, इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील पुरुष आणि उर्वरित सहाजण दिग्रस येथील आहे. यात तीन महिला व तीन पुरुष आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता. यात आज आठ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 75 वर पोहोचली होती. तर, यातील एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या 74 झाली. तर दुसरीकडे, 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या तीन जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 71 झाली आहे.

सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 96 जण भरती आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 87 रिपोर्ट प्राप्त झाले. यात आठ पॉझिटिव्ह आणि 79 रिपोर्ट निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 329 वर पोहोचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर, जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 92 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5 हजार 982 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5 हजार 427 प्राप्त तर 555 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 98 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

यवतमाळ शहरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा हळूहळू या संसर्गाच्या रडारवर येत आहे. यवतमाळ शहरात एक-दोन, एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण नियमितपणे आढळत आहेत. त्यामुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढविण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे सोमवारी या भागात प्रत्यक्ष दाखल झाले. यावेळी त्यांनी शहरातील गुरुदेव नगर, नेताजी चौक, दत्त मंदीर वडगाव, तायडे नगर, रचना सोसायटी, कन्यका सोसायटी या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यामुळे नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. प्रशासनाच्या सुचनांचे गांभीर्य त्यांना दिसून येत नसून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. कोणताही निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो. नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरू नये. तसेच कुठेही गर्दी करू नये. बाहेर जातांना नियमित मास्कचा वापर करावा. 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिक यांची काळजी घ्यावी. हात वारंवार स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.